Amit Palekar
Amit Palekar  Gomantak Digital Team
गोवा

Aam Aadmi Party : आप’चे नेते अचानक दिल्लीला झाले रवाना

गोमन्तक डिजिटल टीम

Aam Aadmi Party : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि यासंबंधी विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार यासाठीच्या हालचालींना वेग आल्याने आम आदमी पक्षाचे राज्य संघटक ॲडव्‍होकेट अमित पालेकर व दोन्ही आमदार आज तातडीने दिल्लीला रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून, भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित यावे यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून आपतर्फे दिल्लीत शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाने आपले सर्व राज्यांतील नेते, आमदार यांना दिल्लीला तातडीने बोलावले आहे.

पक्षाची उद्या बुधवारी बैठक बोलावण्‍यात आली असून, या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. या बरोबरच सत्ताधारी भाजपकडून होणाऱ्या रणनीतीसंबंधी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्व पक्षांना साद

दिल्‍ली सरकारच्‍या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या केंद्राच्‍या अध्‍यादेशाविरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत केजरीवाल यांनी भेटीगाठी सुरू केल्‍या. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्‍या आदेशाला वळसा घालून राज्‍यपालांच्‍या हातीच सूत्रे देणाऱ्या प्राधिकरणाची स्थापना करण्‍याचा अध्‍यादेश केंद्राने काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT