गोवा

"दिल्लीची माजी मुख्यमंत्री, तरीही भाड्याच्या घरात राहते", गोव्याच्या 'आप' प्रभारी आतिषी यांचा थक्क करणारा खुलासा; Watch Video

AAP Leader Atishi Viral Video: या मुलाखतीत त्यांनी आम आदमी पक्ष सामान्य नागरिकांचा कसा आहे, याचा पुनरुच्चार करताना स्वतःबद्दल काही थक्क करणारे खुलासे केले

Akshata Chhatre

पणजी: गोवा प्रदेश आम आदमी पक्षाच्या प्रभारी आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी अलीकडेच 'दैनिक गोमंतक'ला दिलेल्या एका मुलाखतीत गोव्याच्या राजकारणाबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. या मुलाखतीत त्यांनी आम आदमी पक्ष सामान्य नागरिकांचा कसा आहे, याचा पुनरुच्चार करताना स्वतःबद्दल काही थक्क करणारे खुलासे केले आहेत.

आतिशी यांनी स्पष्ट केले की, आम आदमी पक्ष आगामी निवडणुकीत गोव्यातील सामान्य जनतेला तिकीट देईल. त्या म्हणाल्या, "आम आदमी पक्ष हा सामान्य माणसांचा आहे. केवळ आमदार होऊन स्वतःच्या कमाईमधून घर आणि पक्ष असे दोन्ही सांभाळता येत नाही. त्यामुळेच हा पक्ष सामान्य माणसांना संधी देतो." आणि हे सांगताना त्यांनी स्वतःचे उदाहरण समोर ठेवले.

राजकीय पार्श्वभूमी नाही, आजही भाड्याचे घर

आपल्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल बोलताना आतिषी म्हणाल्या, "मी काही मोठ्या राजघराण्यातून किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेली नाही." त्यांचे आई-वडील दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते. स्वतः दिल्लीत मंत्री आणि मुख्यमंत्री देखील राहिलेल्या आतिषी यांनी यावेळी एक मोठा खुलासा केला.

त्या म्हणाल्या, "मी स्वतः आजही भाड्याच्या घरात राहते." त्यामुळे आम आदमी पक्षातील लोक कोणत्याही मोठ्या राजकीय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात, यावर त्यांनी भर दिला. या वक्तव्यावरून 'आप' पक्ष आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत सामान्य आणि मध्यमवर्गीय उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे. या मुलाखतीमुळे गोव्याच्या राजकारणात 'आप'च्या प्रतिमेबद्दल नवा संदेश गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT