Girish Chodankar dainik gomantak
गोवा

पाठिंब्यासाठी 'आप'ची काँग्रेसशी चर्चा सुरूः गिरीश चोडणकर

संख्या कमी पडल्यास सरकारच्या स्थापनेसाठी आप शी आधीच चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचा निकाल काहीच तासांवर येऊन ठेपला असतानाच राजकीय पक्षांचे नवी समिकरणे समोर येत आहेत. कोण म्हणतं आम्ही मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांना पाठिंबा देणार नाही. तर कोण म्हणतो सत्ता स्थापनेसाठी आम्ही भाजपसोडून इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ. दरम्यान गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजकिय धुरळा उडविताना गोव्यात सत्ता स्थापनेसाठी, 'आप' नेते पाठिंबा देण्यासाठी "काँग्रेस नेत्यांशी आधीच चर्चा करत आहेत" असे म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाकडे जाणार याचीच उत्सुकता जनतेला लागलेली आहे. (AAP is in talks with Congress to give its support says Girish Chodankar)

यावेळी चोडणकर यांनी सांगितले की, संख्या कमी पडल्यास सरकार स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी आप (AAP) आधीच आमच्याशी चर्चा करत आहे. मात्र आप चे नेते आणि पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे अमित पालेकर यांच्यासह आपचे इतर नेत्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, याच्या आधीच आप’ने स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार नाहीत.

तर एमजीपी देखील काँग्रेस पक्षाला पाठिंबा देईल, अशी खात्री ही चोडणकर यांनी व्यक्त केली. कारण भाजपने अनेकदा एमजीपीचा विश्वासघात केला आहे. भाजपने सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित करून मंत्रिमंडळातून हाकलले. त्यामुळे MGP भाजपसोबत जाईल असा कोणताही मार्ग नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या वेळी भाजपने गोवा फॉरवर्ड पार्टी (Goa Forward Party) आणि एमजीपीच्या (MGP) पाठिंब्यावर राज्याची सत्ता काबीज केली होती. पण त्यानंतर भाजपने आपल्या मित्र पक्षांनाच संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी त्यांना गोव्यात सरकार स्थापन करण्यास मदत केली, असेही ते म्हणाले.

तर उद्या होणाऱ्या मतमोजणीचा संदर्भ देत चोडणकर म्हणाले, उद्या पक्षाचा नक्कीच विजय होईल आणि तो प्रत्येक गोव्याच्या नागरिकाचा विजय असेल. २०२२ च्या गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) लढत कधीच नव्हती. तर ती लढत जुन्या आणि नव्या काँग्रेसमध्ये होती. आणि नवी काँग्रेस (New Congress) लोकांच्या हृदयात असल्यानेच यावेळी आमचा विजयी नक्कीच होईल, असेही चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT