AAP  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प पूर्णत: रद्द करण्याची ‘आप’ची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने पाहणी करावी अशी विनंती

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यातील रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी आम आदमी पक्षाने आज केली. शिवाय दक्षिण गोव्यातील गावांमधून जाणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प मार्गाची सर्वोच्च न्यायालयाने पाहणी करावी अशी विनंतीही पक्षाने केली आहे.

पणजी येथील ‘आप’च्‍या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाच्‍या नेत्‍या आणि माजी मंत्री एलिना साल्‍ढाणा यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेला कॅसल रॉक-कुळे रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळांनी दिलेली पर्यावरणीय मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, आता दक्षिण गोव्यातील गावांमधून जाणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प मार्गाच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित होतो. या मार्गाचा तेथे राहणाऱ्या लोकांवर काय परिणाम होईल?, ज्या वातावरणात ते राहतात त्या पर्यावरणावर काय परिणाम होईल? असे प्रश्‍‍न त्‍यांनी उपस्‍थित केले.

‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी या प्रकल्पांविरोधात युवकांनी सातत्याने लढा दिल्याबद्दल आणि हा राष्ट्रीय मुद्दा बनवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय वन्य जीव मंडळाने वास्तविकता तपासल्याशिवाय ऑनलाईन बैठकीदरम्यान परवानगी दिली होती याकडेही त्‍यांनी लक्ष वेधले. या प्रकल्पाला सीईसीने अकार्यक्षम, अन्यायकारक आणि विनाशकारी असे म्हटले आहे. सीईसीने असेही नमूद केले आहे की हा प्रकल्प गोव्यासारख्या लहान राज्यासाठी अनावश्यक आहे. या प्रकल्पाचा हेतू कधीच गोमंतकीयांच्या हितासाठी नव्हता आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आम्ही सर्व योग्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे नाईक म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT