AAP

 

Dainik Gomantak 

गोवा

वाढीव पाणी बिलांवरून आपची भाजपवर टीका

पानी बिल या विषयावर बोलताना राहुल म्हांबरे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी पाण्याच्या वाढीव बिलांवरून भाजपवर टीका केली.
पानी बिल या विषयावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला. आम आदमी पार्टीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सावंत केजरीवालची योग्यरित्या कॉपी देखील करू शकत नाहीत.

ऑगस्टमध्ये सावंत सरकारने गोव्यातील (Goa) नागरिकांना 16,000 लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. एवढ्या मोठ्या युनिट्सची निवड का केली याचे कोणतेही तर्क सावंत सरकार देऊ शकले नाहीत. सप्टेंबर सुरू होताच अनेक नागरिकांनी वाढीव बिलांची तक्रार केली. जगासमोर मोठे दावे करत सावंत सरकारने नागरिकांना लुटण्याचा नवा मार्ग शोधल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच शुक्रवारी प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी वाढीव बिले जलविभागाच्या चुकीमुळे आल्याचे मान्य केले. हा फक्त चेहरा वाचवण्याचा मार्ग आहे का? सावंत सरकारने वापरकर्त्यांना वाढीव बिले न भरण्याचे सांगितले असले तरी नागरिकांना प्रशासकीय कारभाराचा सामना करावा लागत आहे.

"ऑक्टोबरमध्ये एका विधवा महिलेला तब्बल 48,000 रुपये बिल आले. हे समजल्यावर मला धक्का बसला. आता प्रमोद सावंत म्हणतात की ही चूक होती आणि ते नोकरशाहीला दोष देत आहेत, पण कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार देत आहे,” असे आप (AAP) गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT