Amit Palekar
Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar: दसरा वाईट शक्तींना मारण्यासाठी असताना भाजप मात्र लोकशाही हत्येच्या प्रयत्नात

Sumit Tambekar

गोवा नगरपालिका कायद्यात अध्यादेशाद्वारे सुधारणा करून लोकशाही हत्येच्या प्रयत्नात भाजप असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप) बुधवारी केला. गोवा आपचे अध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, “दसरा म्हणजे वाईट शक्तींना मारण्यासाठी असताना भाजप मात्र लोकशाही मारण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार खरेदी करण्यापासून ते धोरणात सुधारणा करण्यापर्यंतच्या भाजपच्या सर्व हालचाली बॅकडोअर एंट्रीने केल्या जातात. असा ही आरोप त्यांनी यावेळी केला.

(AAP alleges Democracy being murdered under the BJP rule )

पालेकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजप सरकारने काँग्रेसचे आठ आमदार विकत घेऊन लोकशाहीचा अवमान केला आहे. “सध्या ते तळागाळातील लोकशाही प्रक्रिया नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व विरोध संपवण्यासाठी करण्यात आले होते. असे ही ते यावेळी म्हणाले.

भाजप आणि काँग्रेस एकत्र लोकशाहीला खिंडार पाडताहेत

यावेळी आपचे आमदार इंजीर क्रुझ सिल्वा म्हणाले की, भाजप सरकारमध्ये लोकशाही धोक्यात आली आहे. सरकार ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून विरोध संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, याला विरोध आप नेते करतील असे ते म्हणाले. तसेच बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनीही या अध्यादेशात दुरुस्ती आणण्यासाठी भाजप मागच्या दरवाजाने प्रयत्नशील आहेत. तसेच भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन लोकशाही प्रक्रियेला खिंडार पाडत आहेत. असा आरोपही व्हिएगस यांनी केला

मडगाव नगरपरिषद निवडणुकीपूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी गुप्त मतपत्रिकेऐवजी हात दाखवून नगरपालिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्याच्या नियमात सुधारणा करण्यास मान्यता दिली. मंत्रिमंडळाने परिपत्रकाद्वारे गोवा नगरपालिका (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक) नियम 1969 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आणि सरकार लवकरच या संदर्भात अध्यादेश जारी करेल. यावर ही आपने आपली नाराजी व्यक्त केली.

भाजप आणि काँग्रेस क्रॉस व्होटिंगमध्ये गुंतलेले

गेल्या महिन्यात अपक्ष उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा पराभव करून मडगाव नगरपरिषदेचे नवे सभापती झाले. कामत यांनी इतर सात जणांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवस झाले. घनश्याम यांनी 15-10 ने विजय मिळवला होता, हे दर्शविते की भाजप आणि काँग्रेस दोन्ही समर्थक या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमध्ये गुंतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT