52 IFFI 2021 Dainik gomantak
गोवा

भाजप सरकारसाठी इफ्फी बनला फिक्सिंग फेस्टिव्हल

निविदेपूर्वीच रंगकाम : ‘आप’ने मागितले ‘ईएसजी’कडे स्पष्टीकरण, इफ्फी निविदा प्रक्रियेत फिक्सिंग

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पार्टीचे (AAP) उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक(Valmiki Naik), ताळगाव विधानसभा प्रभारी सेसिल रॉड्रिग्स आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी आंचिमच्या निविदा प्रक्रियेतील फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे. भाजप सरकारसाठी इफ्फी (IFFI) हा फिक्सिंग फेस्टिव्हल बनला असल्याची टीकाही यावेळी ‘आप’कडून करण्यात आली.

यावेळी ‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याने 70 लाखांच्या बाह्य रंगकामाची निविदा काढली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निविदा सादर करायच्या होत्या. ही निविदा बुधवारी सकाळी 11 वाजता उघडली जाणार होती. सर्वात कमी बोली लावणाऱ्याला ही निविदा दिली जाणार होती. पण निविदा न उघडताच पेंटिंगचे सर्व रंगकाम पूर्ण झाले आहे. इफ्फीची मूळ एजन्सी असलेल्या ईएसजीचे सीईओ, व्हाईस चेअरमन यांना आमची विनंती होती की, या निविदा रद्द करा. त्यांनी बांधकाम खात्याला पत्र लिहून निविदा रद्द करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. आश्चर्य म्हणजे ईएसजीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांना इफ्फीची ठिकाणेच माहिती नाहीत.

सीईओ डॉ.तारिक थॉमस यांनी बांधकाम खात्याला पत्र पाठवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पण, आम्ही आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही. आम्ही या प्रकरणी चौकशीची मागणी करत आहोत. 24 तासांत आम्हाला उत्तर हवे आहे. अन्यथा उत्तर मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू, असे नाईक म्हणाले.

सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या, नियम फक्त सामान्य लोकांसाठीच आहेत. सरकार अधिकाराचा बेजबाबदारपणे वापर करत आहे. इफ्फी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्सव आहे आणि सरकार त्यातून पैसे कमावत आहे.

आम्ही साबांखाचे अभियंता, ईएसजीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सीईओ यांना भेटलो. परंतु कोणालाही याची माहिती नाही. या घटनेने माजी राज्यपाल मलिक यांचे राज्य सरकारबाबतचे भ्रष्टाचाराचे विधान सिद्ध होते.

- सुनील सिग्नापूरकर, ‘आप’चे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT