Ponda Dainik Gomantak
गोवा

लोकप्रतिनिधींच्या कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा 'आप'चा फोंडा पालिकेवर आरोप

फोंड्यात अनेक ज्‍वलंत समस्या स्‍थानिकांना भेडसावत आहेत.

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंड्यातील (Ponda) विकासकामांबाबत अनेक समस्या असून या समस्यांना वाचा फोडणारा कुणीच वाली नाही. फोंडा पालिका असून नसल्यासारखी झाल्‍याचा आरोप आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत केला. फोंड्यात अनेक ज्‍वलंत समस्या स्‍थानिकांना भेडसावत आहेत. त्‍या दूर करण्यासाठी मतदारसंघातील सरपंच, पंचसदस्य, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी त्वरित प्रयत्न करावेत. प्रलंबित विकासकामे आधी हाती घ्या, अशी मागणी सुरेल तिळवे यांनी केली.

नगरसेवक अविश्‍वासात मग्‍न!

फोंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेला भानुदास नाईक, सेबी रॉड्रिगीस, सुकेंदू रेड्डी यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. सुरेल तिळवे म्हणाले की, फोंडा पालिकेत सध्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू असून फोंड्याचे नगरसेवक एकमेकांविरुद्ध अविश्‍वास ठराव आणण्यात गुंतले आहेत. सत्तेसाठी एकमेकांना पळवण्याचे आणि इकडून तिकडे उड्या मारण्याचे प्रकार घडत असून लोकशाहीची ही थट्टा असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. विकासकामांच्याबाबतीत फोंड्यातील नगरसेवक अपयशी ठरले असून सध्या फोंड्याला कुणी वालीच राहिला नसल्याचेही सुरेल तिळवे म्हणाले.

समस्‍या ढिगभर

फोंड्यात पार्किंग विषय, कचऱ्याचे मुद्दे, मलनिस्सारण प्रकल्प, तसेच खड्डेमय रस्ता हे महत्त्वाचे विषय प्रलंबित आहेत. मात्र, त्‍यांच्‍याकडे पालिकेचे अजिबात लक्ष नाही. विक्रेत्यांकडून अडवण्यात आलेले रस्ते आणि फुटपाथ याकडे पालिकेने दुर्लक्ष केले असून बाजारात जाणेही सध्या मुश्‍किलीचे ठरल्याचे सुरेल तिळवे म्हणाले. नगरसेवकांत सध्या फोडाफोडीचे राजकारण चालले आहे. सेबी रॉड्रिगीस यांनी लोक उघड्यावर शौचविधी करून परिसर अस्‍वच्छ करीत असल्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT