Purple Fest Amir Khan  Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Purple Fest Amir Khan: पर्पल फेस्टसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही येण्याचे कबूल केले आहे. आमीर खान यांना निमंत्रित करण्यासाठी भेट घेतली तेव्हा ते दोन तास देतील याची कल्पना नव्हती.

Sameer Panditrao

पणजी: दिव्यांग सशक्तीकरणासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या पर्पल फेस्ट या महोत्सवासाठी अभिनेते आमीर खान यांची भेट घेण्यासाठी दिव्यांग सशक्तीकरणमंत्री सुभाष फळदेसाई त्यांना भटले असता दोन तास आमीर खान यांनी त्यांच्यासाठी दिले. पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना फळदेसाई यांनी हा अनुभव सांगितला.

ते म्हणाले, यंदाच्या पर्पल फेस्टसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही येण्याचे कबूल केले आहे. आमीर खान यांना निमंत्रित करण्यासाठी भेट घेतली तेव्हा ते दोन तास देतील याची कल्पना नव्हती. पर्पल फेस्ट दरम्यान राबवण्यात येणारे उपक्रम आणि दिव्यांग सशक्तीकरणासाठी सरकारी पातळीवर करण्यात येणारे प्रयत्न याची माहिती त्यांनी घेतली.

यासाठी त्यांनी दोन तास दिले हे भेट आटोपती घेताना लक्षात आले. एवढ्या मोठ्या अभिनेत्याने सामाजिक कार्यासाठी एवढा वेळ द्यावा हे विरळच. इतरांनाही आदर्शवत. त्यांच्या निवासस्थानी हा वार्तालाप झाला.

आमीर खान यांनी स्वतः येण्याचे कबूल केलेच पण त्यांनी सितारे जमीन पर या चित्रपटातील कलाकारांनाही पर्पल फेस्टमध्ये सहभागी होण्याचे तेथूनच दूरध्वनीवर आवाहन केले. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ३० देशांचे प्रतिनिधीही येणार आहेत. राज्याचे दिल्लीतील निवासी आयुक्त या दरम्यान गोव्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajasthan vs Goa womens T20: गोव्याच्या महिला संघाचा विजय, 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात राजस्थानला नमविले

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

SCROLL FOR NEXT