Aam Aadmi Party in Goa Dainik Gomantak
गोवा

AamAadmiParty: "गोंयांत आतां बदल घडोवया'' आम आदमी पार्टीचं आभियान सुरु

गोव्यात आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party in Goa) वतीने "गोव्यात आता बदल घडवूया" हे अभियान सुरू करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party in Goa) वतीने "गोव्यात आता बदल घडवूया" हे अभियान सुरू करण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या हस्ते करण्यात आली असून यापुढील काळात हे अभियान सुरू राहणार आहे.

विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांच्या मताशी त्यांच्या विचारांशी विश्वास घात केलेल्या काँग्रेस (Congress) आणि भाजपला (BJP) मतदान करू नका असं आवाहन करत तशा स्वरूपाची प्रतिज्ञा करावी असं आवाहन पक्षाचा वतीने करण्यात आले आहे यावेळी पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण होणार असल्याने राजकारणातील या प्रवृत्तींना हद्दपार करण्याची मोहीम आम आदमी पक्ष राबवणार आहे. आपचे नेते राघव चड्ढा यांच्या हस्ते या मोहिमेची शनिवारी सुरवात होणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली.

चढ्ढा यांनी आपण गोव्यात येत असल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. गोमंतकीय या दहा आमदारांच्या कृतीने संतप्त असून, गोमंतकीयांना त्यांचा विश्वासघात या आमदारांनी केल्याची भावना बळावली आहे, असे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. गोमंतकीयांचा विश्वासघात न विसरण्याजोगा राघव चड्ढा हे गोव्यातील राजकारणाला हादरवून टाकेल अशा घटनेची आठवण करून देणारी मोहीम राबवतील. कॉंग्रेसच्या ७० टक्के आमदारांनी गोमंतकीयांचा विश्वासघात केला, ही छोटी गोष्ट खचितच नाही. दोन वर्षे झाली तरी गोमंतकीय ही गोष्ट विसरलेले नाहीत. जनता त्यांना योग्यवेळी जाब विचारेलच, असे म्हांबरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT