Atishi Sing AAP Dainik Gomantak
गोवा

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

Goa Politics: आम आदमी पार्टी गोव्यासाठी नवा राजकीय पर्याय म्हणून पक्षाने जी प्रतिमा तयार करण्याचा सुरू केलेला प्रयत्न केविलवाणा ठरला आहे. हा सर्व घटनाक्रम पक्षाची वाढ खुंटवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa AAP Crisis : जिल्हा पंचायत निवडणुकीत गोव्यात आम आदमी पक्षाला लोकांकडून न मिळालेला प्रतिसाद आणि त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष अमित पालेकर यांच्यावर केलेली कारवाई, आणि त्यानंतर पालेकर यांच्यासह पाच नेत्यांनी दिलेला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. या साऱ्या घटना पाहता आम आदमी पार्टी गोव्यासाठी नवा राजकीय पर्याय म्हणून पक्षाने जी प्रतिमा तयार करण्याचा सुरू केलेला प्रयत्न केविलवाणा ठरला आहे. हा सर्व घटनाक्रम पक्षाची वाढ खुंटवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘आप’ला गोव्यात लागलेल्या या गळतीचे कारण पक्षाचे दिल्लीतील नेतृत्व असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. ‘आप’ची गोव्यात राबवली गेलेली दिल्लीस्थित धोरणे सध्या गोव्यात त्यांना मारक ठरत आहेत.

‘आप’च्या धोरणाबद्दल आपले मत व्यक्त करताना राजकीय विश्‍लेषक प्रभाकर तिंबले म्हणाले, ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष असून राजकीय पक्षांना मिळालेला राष्ट्रीय दर्जा सांभाळून ठेवण्यासाठी अशा पक्षांना निवडणुकीत काही टक्के मते मिळवावी लागतात. ही मतांची टक्केवारी डोळ्यांसमोर ठेवून ‘आप’ने गोव्यात ‘एकला चलो’ हे धोरण राबवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यावेळी त्यांचा हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असेच म्हणावे लागेल.

दिल्लीत निर्णयांमुळे कार्यकर्ते नाराज

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर असताना ‘आप’चा राजीनामा दिलेले रामराव वाघ यांनीही या गळतीसाठी केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरताना, गोव्यातील कार्यकर्त्यांची मते विचारात न घेता आणि गोव्यातील नेत्यांना विश्वासात न घेता केंद्रीय नेत्यांनी परस्पर दिल्लीत बसून निर्णय घेण्याचे सत्र आरंभल्यामुळेच स्थानिक कार्यकर्ते पक्षावर नाराज झाले होते. हे सामूहिक राजीनामे त्याच नाराजीचा भाग आहे, असे ते म्हणाले.

‘आप’ची गोव्यातील धोरणे पाहता या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना गोवा म्हणजे काय हेच समजलेले नाही हेच दिसून येते. भाजपला जर गोव्यात हरवायचे असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात लढले पाहिजे ही गोव्याच्या जनतेची भावना आहे. मात्र ‘आप’ अगदी त्याच्या उलट वागतो, असे लोकांना वाटत असल्यानेच जनतेने या पक्षाला अव्हेरले.
राजेश कलंगुटकर, माजी ‘आप’ नेते
गोव्यात तिसरा पर्याय म्हणून पुढे येण्याचा ‘आप’चा प्रयत्न झेडपी निवडणुकीत या पक्षाला मिळालेली मते पाहता फसला आहे, असेच म्हणावे लागेल. गोव्यात या पक्षाचे दोन आमदार असताना जिल्हा पंचायत निवडणुकीत या पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून येणे ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. मात्र गोव्यात पक्षाचा विस्तार व्हावा या दृष्टीने ‘आप’ने तयारी चालवली होती, असे वाटत होते. मात्र राजीनामा सत्र पाहता पक्ष विस्तार त्या पक्षातील नेत्यांनाच मान्य नाही, हे स्पष्ट होते.
ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो, राजकीय विश्‍लेषक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT