Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Goa Visit: अरविंद केजरीवाल यांचा गोवा दौरा का महत्वाचा आहे? चार मुद्दे

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांचा गोवा दौरा का महत्वाचा मानला जात आहे जाणून घेऊया पाच मुद्यातून...

Pramod Yadav

Arvind Kejriwal Goa Tour: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुरुवारपासून (दि.18) गोवा दौऱ्यावर येत आहेत.

कथित दारु घोटळाप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने चौथे समन्स बजावले आहे. 18 जानेवारी रोजी ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले असताना केजरीवाल गोवा दौऱ्यावर येत असल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केलीय.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांचा गोवा दौरा का महत्वाचा मानला जात आहे जाणून घेऊया पाच मुद्यातून...

लोकसभा निवडणूक

अरविंद केजरीवाल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तयारीचा आढावा घेतील. राज्यातील पक्षाचे आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि वरीष्ठ नेते यांच्याशी ते चर्चा करतील.

जागा वाटप

आप इंडिया आघाडीचा भाग आहे पण अद्याप जागा वाटपाबाबत निर्णय झाला नसल्याने गोव्यात पक्षाला जागा मिळणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे. आम आदमी पक्ष गोव्यात एक जागा लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिलीय.

इंडिया आघाडी आणि जागा वाटपाबाबत केजरीवाल राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

ईडीची चौकशी आणि दौरा

कथित दारु घोटळाप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने 18 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अशात केजरीवाल गोवा दौरा करत असल्याने भाजप त्यांच्यावर टीका केलीय.

केजरीवाल चौकशीपासून लांब पळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन

गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील महिन्यात 02 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल त्यांच्या दोन आमदारांना काय कानमंत्र देण्याची शक्यता आहे.

राज्यातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा देखील केजरीवाल घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT