Chief Minister Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

गोव्याला पुढे नेण्यासाठी आम आदमीचे सरकार येणे गरजेचे: अरविंद केजरीवाल

सालेली येथे विश्वजीत कृष्णाराव राणे (Vishwajeet Krishnarao Rane) यांना आप पक्षात प्रवेश देण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गोवा (Goa) राज्याला पुढे नेण्यासाठी आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे, मी नेता नाही, तुमच्या सारखा आम आदमी आहे, त्यामुळे आम आदमीच्या समस्या काय असतात त्या मला पुर्ण माहित आहे, त्यामुळे गोव्यात लुट मार सुरू असलेल्या भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना घरी पाठवून भ्रष्टाचार मुक्त सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या मागे उभे राहून पर्येतील पन्नास वर्षांपासूनची सुरू असलेली राजवट उलथून टाकण्यासाठी विश्वजीत कृष्णाराव राणे यांना साथ द्यावी असे आवाहन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी सालेली येथे विश्वजीत कृष्णाराव राणे (Vishwajeet Krishnarao Rane) यांना आप पक्षात प्रवेश देण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री महादेव नाईक, सत्यविजय नाईक, अॅड अमित पालेकर, अॅड गणपत गावकर, विश्वजित कृष्णराव राणे, आपचे राहूल म्हाबंरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की दिल्लीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे सरकार आळिपाळीने येत होते, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला होता, त्यामुळे तेथील आम आदमी ने एकत्र येऊन गेल्या सात वर्षांपासून त्याना सत्तेवर येण्या पासून रोखुन धरले आहे, त्यामुळे आज दिल्लीत सर्व प्रकारच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, दिल्लीत सात वर्षांच्या काळात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याप्रमाणे गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नोकऱ्या दिल्या जाणार आहे, तर बेरोजगारांना महिना 3000 हजार रुपये बेकारी भत्ता दिला जाईल, त्याच प्रमाणे मोफत विज, पाणी, चांगल्या दर्जाच्या सरकारी शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. पर्ये मतदारसंघातील जनता 50 वर्ष आमदार निवडून देत आहे, तरी येथिल समस्यांचे निवारण झाले नाही.

त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात आम आदमीचे सरकार आल्यास भ्रष्टाचार पुर्ण पणे बंद करून तो पैसा सामान्य जनतेला दिला जाईल, आज पावसामुळे सभेला व्यत्यय आला तरी पुढच्या काही दिवसात पर्ये मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी पुन्हा एकदा येथे येईल असे शेवटी सांगितले. यावेळी महादेव नाईक यांनी दिल्ली प्रमाणे गोव्यात सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत चमत्कार होऊन आप पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यामुळे पर्येतील जनतेने विश्वजीत कृष्णाराव राणे यांना साथ द्यावी अशी हाक मारली.

यावेळी अॅड गणपत गावकर यांनी गोव्याला दिल्ली माॉडेल बनवण्यासाठी आपण आप पक्षात प्रवेश केला आहे. येथिल एकाच घराण्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी आप पक्षात प्रवेश केलेले विश्वजीत कृष्णाराव राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या मतदार संघात 50 वर्षे नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यामुळे या वेळ आली की त्याला फसवण्याची त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे, आपण निवडून आल्यास सर्वांना सरकारी नोकरी नोकऱ्या जरी देऊ शकलो नाही तरी मतदार संघात मल्टिनशनल कंपन्या आणून सोळा हजार जणांना नोकऱ्या देणार आहे, तर या मतदार संघात चे साठ वर्षांत झाले नाही ते मी साह महीन्यात करून दाखवणार आहे असे स्पष्ट केले.

या सभेचे सुत्रसंचलन लक्ष्मण झोरे यांनी केले तर राजेश राणे यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीत म्हणून सभेची सांगता केली. दरम्यान सदर सभा खुल्या जागेत मंडप उभारून घेण्याची तयारी केली होती, परंतू या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सभेचे स्थळ जवळ असलेल्या काजू कारखान्याच्या आतील भागात हलवण्यात आले. त्यामुळे उपस्थितांना उभे राहावे लागले. सदर सभेला साधारण एक हजार नागरिकांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT