Colvale Police arrests accused  Dainik Gomantak
गोवा

Colvale News: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरूणाला गोव्यात अटक

कोलवाळ परिसरात होते वास्तव्य

Akshay Nirmale

Colvale Police Arrests Accused: अहमदनगर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या 23 वर्षीय युवकाला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. युवराज उर्फ सोन्या कोटकर असे या संशयित आरोपीचे नाव आहे. कोलवाळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती गोवा पोलिसांनी दिली होती.

युवराज कोटकर याने 16 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. तो सध्या कोलवाळ भागात राहत होता. गोवा पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखालील पथकाने युवराज कोटकर याला अटक केली.

कोलवाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी या पथकाचे नेतृत्व केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक, कॉन्स्टेबल संदीप मलिक आदींचा समावेश होता.

कोलवाळ भागात पाहणी करून युवराज कोटकर याला चिखलीतून ताब्यात घेतले. आणि अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. संशयित कोटकर याच्यासह संबंधित मुलीला अहमदनगरच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT