Vagator Beach Dainik Gomantak
गोवा

Vagator Beach Accident: सेल्फीच्या नादात युवक बुडाला!

वागातोर येथील घटनाः मृतदेहाचा शोध सुरू, घटनास्थळी पोलिस दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Vagator Beach Accident: वागातोर किनाऱ्यावरील खडकावर सेल्फी काढण्याच्या नादात एक युवक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अर्जुन कुमार (२२, रा. नेरुल व मूळचा गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे समुद्रात बुडालेल्या या युवकाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास घडली.

अर्जुन हा आपला मेव्हुणा व मित्रासोबत ‘स्मॉल वागातोर’ येथील किनाऱ्यावर आला होता. समुद्र खवळलेला असल्याने येथील जीवरक्षकांनी या तिघांना खडकावरून खाली उतरण्यास सांगितले होते.

मात्र, वेळेचे गांभीर्य व सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने मोठी लाट आली आणि क्षणार्धात अर्जुन दिसेनासा झाला.

जीवरक्षकांनी चारवेळा या तिघांना खडकावरून खाली येण्यास सांगितले होते. मात्र, या तिघांनीही खडकावर वेळ काढला. यावेळी अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेत अर्जुन पाय घसरून पडल्याने समुद्रात ओढला गेला व गायब झाला.

या घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक, अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व शोधकार्य राबविले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत अर्जुनचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता.

अर्जुन हा गेल्या मे मध्येच गोव्यात कामासाठी आला होता. घटनेवेळी अर्जुन सोबत त्याचा मेव्हुणा (बलिंदर कुमार) व त्याचा मित्र होता. अर्जुन हा फॅब्रिकेशनचे काम करायचा. रविवार असल्याने हे तिघेही येथे फिरण्यासाठी व समुद्रस्नान करण्यासाठी आले होते.

जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे, पण अनेकजण सूचनांकडे दुर्लक्ष करतात. मध्यंतरी केरी - पेडणे येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चौघांनी प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केला होता.

सेल्फी घेण्याच्या नादात आलेल्या मोठ्या लाटेने चौघांनाही ओढून नेले होते आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT