A young woman in North Goa was being harassed by a young man Police make arrests Dainik Gomantak
गोवा

अश्लील व्हिडिओची महिलेला दिली धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी केले प्रवृत्त

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गुन्हे समोर येताना दिसत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे गुन्हे जास्त घडताना दिसत आहेत. असा एक प्रकार उत्तर गोव्यातून (north-goa) समोर आला आहे. सोशल मीडियाद्वारे उत्तर गोव्यातील एका विवाहित महिलेसोबत एका युवकाने मैत्री केली. मैत्रीनंतर अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी त्याने तिला प्रवृत्त केले आणि त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून (social-media) प्रसारित करण्याची धमकी तिला हा तरुण वेळोवेळी देत राहिला.

अन्यथा त्याबदल्यात तिच्याकडे तो पैशांची मागणी करत होता. याची तक्रार महिलेने थेट पोलिसात केली आहे. पैसे मागितल्याप्रकरणी सायबर (cyber) क्राईम पोलिसांनी सुरेल पांचाळ (32, मध्य प्रदेश) या संशयित तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, वास्को येथे एका चोरट्याने रिकामे गॅस सिलिंडर चोरल्याची घटना घडली आहे. बायणा येथे घराच्या वरांड्यात ठेवलेले रिकामे सिलिंडर चोरल्याप्रकरणी परसप्पा हरीजन या संशयिताला वास्को पोलिसांनी (Vasco Police) अटक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाल्याने पोलिसांनी संशयितास गजाआड केले. वास्को पोलिसांनी सांगितले की, 30 मार्च ते 3 एप्रिल या काळात हा चोरीचा प्रकार घडला. 30 मार्च रोजी बायणा येथे प्रशांत नार्वेकर यांच्या घराच्या व्हरांड्यात रिकामा सिलिंडर ठेवलेला होता. 3 एप्रिल रोजी तो गायब झाल्याचे दिसून आले.

त्यांनी पोलीस स्थानकात त्याबाबत तक्रार नोंदवली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यावर एकाने दुचाकीवरून सिलिंडर नेल्याचे दिसले. त्यानंतर परसप्पा हरीजन (वय 39, रा. बायणा, वास्को) यास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकीही जप्त केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT