दूधसागर पर्यटन क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, केला 'हा' संकल्प

स्थानिकांच्या आर्थिक उत्पन्नात देखील होणार वाढ
Chief Minister Pramod Sawant's resolve to develop Dudhsagar area in terms of tourism
Chief Minister Pramod Sawant's resolve to develop Dudhsagar area in terms of tourismDainik Gomantak

मडगाव : धारबांदोडा तालुक्याची मुख्य ओळख हा दूधसागर धबधबा आहे. त्यामुळे या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा संकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी व्यक्त केला आहे. ते आज या परिसराला भेट देण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या बरोबर सावर्डेचे आमदार गणेश गावकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Minister Pramod Sawant's resolve to develop Dudhsagar area in terms of tourism
काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभियंत्यांच्या कार्यालयात टेकली पाठ, कारण...

दूधसागर (Dudhsagar) धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण आहे. दूधसागर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. मात्र याठिकाणी पर्यटकांची राहण्याची सोय होत नाही, त्यामुळे पर्यटकांना येथे राहता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना देखील आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पर्यटकांना राहण्यासाठी मोले येथे कुटीरे उभारण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात सावंत यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना स्थानिक मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले की, भारत दर्शन योजनेखाली हा भाग पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचा आराखडा तयार केला होता. यासाठी खासदार विनय तेंडुलकर यांनी केंद्र सरकार मार्फत प्रयत्न केले होते. मात्र नंतर काही कारणात्सव ही योजना मार्गी लागू शकली नाही. आता तीच योजना पुढे नेण्याचे ठरवले आहे. तसेच या परिसराची देखभाल आणि पर्यटकांसाठी (Tourist) इतर सोयी उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com