Goa Crime News |  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सांगेत ‘सिडनी’ची दादागिरी; महिलेला मारहाण

Goa Crime News: तक्रार दाखल : संतप्‍त महिलांनी दिली पोलिस स्‍थानकावर धडक

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

सांगे येथील एका महिलेची गेले वर्षभर सतावणूक होत असूनही, तसेच याप्रकरणी तब्‍बल पाच वेळा सांगे पोलिस स्थानकात तक्रार करूनही प्रत्येक वेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून ‘सिडनी’ नामक युवकाला एकप्रकारे पाठीशीच घातले आहे.

त्‍यामुळे त्‍याचे आणखीच फावले. अखेर हे प्रकरण उपजिल्हाधिकारी न्यायालयात पोहोचले. तेथील काम संपवून बाहेर येताच आपल्याला सिडनी मोंतेरो याने (रा. कासावली) मारहाण केल्याची तक्रार सोफिया मास्कारेन्‍हस या महिलेने आज सांगे पोलिस स्थानकाबाहेर पत्रकारांशी बोलताना केली.

सोफिया म्हणाल्या की, गेले वर्षभर सिडनी हा युवक माझी सतावणूक करत आहे. शिवीगाळ करणे, माझ्‍या मुलींना धमकावणे एवढ्यावरच न थांबता आता तर मारहाण करण्‍यापर्यंत त्‍याची मजल गेली आहे. यावेळी त्‍यांनी मारहाणीचे वळ पत्रकारांना दाखविले.

दुसरीकडे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी सांगितले की, सिडनी याला अटक करून त्‍याच्‍याविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

दरम्यान, याच प्रकरणावरून स्थानिक नगरसेवक मेशू डिकॉस्‍टा यांनी गावातील महिलांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवून अटक करण्यासाठीच समन्स पाठविण्‍यात आले. त्‍यामुळे शंभरेक नागरिक तसेच महिलांनी सांगे पोलिस स्थानकात धाव घेऊन याप्रकरणी पोलिसांना जाब विचारला.

त्‍यावर पोलिस निरीक्षक गावस यांनी सांगितले की, ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणी तक्रार दाखल करून घेऊन उद्या सकाळी संबंधितांना पोलिस स्थानकात बोलाविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT