Major Port Authority dainikgomantak
गोवा

गोवेकारांना त्रासदायक ठरणारे निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू

मेजर पोर्ट ऑथोरिटी व पोर्ट लिमिट त्रासदायक निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार

दैनिक गोमन्तक

काणकोण : मेजर पोर्ट ऑथोरिटी व पोर्ट लिमिट (Major Port Authority and Port Limit) हे गोवेकारांना त्रासदायक ठरणारे निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा रापणकाराचो एकवोटचे ओलेन्सिओ सिमोईश यांनी आज पाळोळे येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिला. या दोन निर्णयामुळे दोन राज्यात दोन सत्ता केंद्रे कार्यरत झाली आहे. त्याचा परिणाम सद्या वास्को येथील बायणा व खारीवाडा येथील रहिवासी अनुभवत आहे.

पोर्ट लिमिट बेतूल पर्यंत आले आहे. ते कधीही काणकोण मध्ये येऊ शकते. मेजर पोर्ट ऑथोरिटी ही स्वायत्त प्राधिकरण असून त्याची मालकी अथानी, झिंदाल व वेंदाता या बड्या व्यावसायिकांकडे आहे. या ऑथोरिटीला राज्याचा कायदा, नगर नियोजन कायदा व अन्य नियम लागत नाहीत. सागरमाला अंतर्गत राज्यातील किनारी भाग व येथील रहिवाश्यांना निराश्रित करण्याचा घाट सरकारने रचला आहे. काणकोणमधील तळपण, गालजीबाग नद्याचे राष्ट्रीयकरण होणार आहे. सद्या वेर्णा येथे कोल्ड स्टोरेज हब उभारण्यात येत आहे. (warning that the agitation will come down if the annoying decision is not taken back)

गोवा कोळसा हब बनवून गोवेकरांच्या तोंडाला काळे फासण्याचा घाट सरकारने (government) रचला आहे. आता कोळसा चांदर पर्यंत आला आहे. यापुढे तो कुडचडे व त्यानंतर तो बाळ्ळी पर्यंत येणार आहे. कोळश्याची (Coal) वाहतूक करण्यासाठी नद्याचे राष्ट्रीय करण करण्यात येत आहे. त्यासाठी रहिवाशांनी आताच जागृत होण्याची गरज असल्याचे मत विकास भगत यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी गोंयचो एकवोटचे ऑर्विलो दौरादो उपस्थित होते. बैठकीचे सुत्र संचालन अजय पागी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT