Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा प्रसिद्ध छत्रोत्सव शनिवारी; हिंदू-ख्रिश्चन एकोप्याचे दर्शन

Goa News : पालखी मिरवणुकीत सर्वांचा सहभाग, ठिकठिकाणी स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

कुकळ्ळी, हिंदू-ख्रिस्ती भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचा वार्षिक छत्रोत्सव शनिवारी (ता. ३०) होणार आहे.

यावेळी शेकडो भाविक गुलालाची उधळण करीत, ढोल ताशाच्या गजरात बारा छत्र्या नाचवत गुलाल अर्पण करत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

दुपारी दीड वाजता देवीच्या पालखी मिरवणुकीला फातर्पा येथून सुरवात होणार आहे. दुपारी बारा वाजता धार्मिक विधी झाल्यावर भक्त देवीला गुलाल अर्पण करून आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत.

यावेळी भक्तांतर्फे बारा छत्र्या नाचवत ढोल ताशाच्या गजरात देवीचा जयजयकार करीत देवीची पालखी मिरवणूक पारंपरिक गोविंद घाटी मार्गाने मल्लागिणी, जुझेंगाळ, सिद्धनगर, नायगिलो, भिवसा, व्होडी या मार्गाने मूळस्थानी तळयेभाट येथे येणार आहे. भक्त वेगवेगळ्या ठिकाणी देवीचे स्वागत करून देवीला नारळ ओटीची भेट अर्पण करून देवीचे आशीर्वाद घेणार आहेत.

देवी शांतादुर्गा कुकळ्ळीकरीण संस्थानला मोठी परंपरा व इतिहास आहे. सोळाव्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीज सत्तेने राज्यात धर्मातरण सुरू केले, तेव्हा स्वधर्म व स्वराज्यासाठी कुंकळ्ळीकरांनी मोठा लढा दिला.

त्यावेळी धर्मरक्षणासाठी फातर्पा या सुरक्षित ठिकाणी देवीची मूर्ती हलविण्यात आली होती. तेव्हापासून फातर्पा येथे देवी स्थापित करण्यात आली. तेव्हा देवीने भक्तांना दृष्टात देऊन फाल्गुन पंचमीला आपल्याला मूळस्थानी तळयेभाट येथे बारा वांगड्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत बारा छत्र्या नाचवत नेण्याचे फर्मान काढल्याचे सांगण्यात येते. गेली साडेचारशे वर्षे ही परंपरा अखंडपणे चालू आहे.

ख्रिस्ती भाविकांकडूनही मंडप घालून स्वागत

हिंदूंबरोबरच ख्रिस्ती भाविकही या उत्सवात मोठ्या उमेदीने भाग घेतात. हिंदू - ख्रिस्ती धार्मिक सलोख्याची मिसाल असलेला हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.

ख्रिस्ती भाविकही हिंदू भाविकाप्रमाणे डोक्यावर फेटा बांधून छत्र्या नाचवत मनसोक्तपणे गुलालाची उधळण करण्यात धन्यता मानतात. ज्या ख्रिस्तीबहुल भागातून देवीची पालखी जाते तेथे ख्रिस्ती भाविक खास मंडप घालून देवीचे स्वागत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT