Cortalim accident news Dainik gomantak
गोवा

कुठ्ठाळीत मालवाहू रिक्षाने दोन दुचाकींना ठोकले, 3 जखमी

या अपघातामुळे सुमारे एक तास चक्का जाम झाला होता.

दैनिक गोमन्तक

कुठ्ठाळी सत्रांत येथे एका मालवाहू रिक्षाने ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकींना ठोकरल्याने दुचाकीचालकासहित तीघेजण गंभीर जखमी झाले. रिक्षाचालकाला वेर्णा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे (accident) सुमारे एक तास चक्का जाम झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच वाजता कुठ्ठाळीहून मडगावच्या दिशेने जाणार्‍या एका मालवाहू रिक्षाने ( क्र. जीए12 टी-0432 ) येथील सत्रांत येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढून येणाऱ्या दोन दुचाकींना ठोकर देऊन ही रिक्षा पलटी झाली. यात दुचाकीवरील तिघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. तर रिक्षा चालकाला किरकोळ जखम झाली आहे. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघातस्थळी दुपारी सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी (police) घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वेर्णा पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT