CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government : प्रशासन तुमच्या दारी; बाराही मंत्री आज तालुका ठिकाणी

प्रसमस्‍या जाणणार; योजनांची देणार माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 वर्षे आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारतर्फे दोन दिवसीय ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.

यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व बाराही मंत्री उद्या शुक्रवार दि. 17 मार्च रोजी तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपस्थित राहून लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांना समजाव्यात आणि सर्वसामान्य जनतेला या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्‍यात आला होता.

आता त्‍यात काहीसा बदल करत राज्य सरकारच्या वतीने ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्‍यानुसार उद्या शुक्रवारी सर्व मंत्री सर्व बाराही तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतील आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना समजावून सांगतील.

शिवाय शनिवारी नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सर्व 191 ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना भेट देणार आहेत.

तालुकावर भेटीचा तपशील

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : - केपे

विश्वजीत राणे : - सांगे

माविन गुदिन्हो : - सत्तरी

रवी नाईक : - तिसवाडी

नीलेश काब्राल : - काणकोण

सुभाष शिरोडकर : - पेडणे

रोहन खंवटे : - सासष्टी

गोविंद गावडे : - मुरगाव

बाबूश मोन्सेरात : - फोंडा

सुदिन ढवळीकर : - बार्देश

नीळकंठ हळर्णकर :- धारबांदोडा

सुभाष फळदेसाई :- डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT