Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: स्मार्ट सिटी पणजीत रस्त्याच्या मधोमध भलंमोठं भगदाड; विटांचा ट्रक उलटून 4 कामगार गंभीर जखमी

रस्ता खचल्याने घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident: रस्तात पडलेल्या भगदाडामध्ये चाक अडकून जांभ्या विटांची वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात उलटला. पणजीतील मध्यवर्ती परिसरात ही घटना घडली आहे. काकुलो मॉल परिसरात ही घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली असून या घटनेत 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

मागील पाच ते सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे दोन्ही बाजूंनी खोदकाम केले आहे. अपघात घडला त्यावेळीही सदर काम सुरु असून कामावर असलेले कर्मचारी यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. या ट्रकची पुढची काच फुटली असून ट्रक पुर्णपणे खड्ड्यात कलंडला आहे. ट्रकमधील विटाही खड्ड्यात पडल्या आहेत. ट्रकची एक बाजू पुर्णतः खड्ड्यात आहे. हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.

दरम्यान, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बॅरेकेडिंग करून हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. या ट्रकमधील साहित्य स्मार्ट सिटी योजनेतील कामासाठी नेले जात होते का, असे विचारल्यावर मोन्सेरात यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT