Curchorem Dainik Gomantak
गोवा

Curchorem: अगोदरच रस्ते खोदलेले; त्यातच खड्ड्यात रुतला ट्रक, कुडचडेत वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

वाहतूक कोंडीमुळे कुडचडेतील नागरिक त्रस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Curchorem: सिवरेजसह विविध वाहिन्या टाकण्यासाठी कुडचडेत रस्ते खणून ठेवले आहेत. या रस्त्यावरून खनिज वाहतूक सुरू केल्याने कोंडी होऊन नागरिकांची जास्त गैरसोय होत आहे.

आज सकाळी काकोडा येथे रस्त्यावरच खनिज वाहतूक करणारा ट्रक रूतला. त्यामुळे वाहतुकीच्‍या कोंडीत आणखी भर पडली.

सकाळी रुतलेला हा ट्रक दुपारी साडेबारापर्यंत खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला नव्हता. सध्या लिलाव केलेल्या खनिज मालाची वाहतूक केली जात आहे.

त्यामुळे काकोडा, बाणसाय आणि रवींद्र भवन परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. या भागात खड्ड्यात ट्रक रुतण्याची ही पाचवी घटना आहे.

खोदलेल्‍या रस्‍त्‍यांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. त्‍यातच आता खनिज वाहतूक सुरू केल्याने लोकांचे हाल अधिक वाढले आहेत. रस्ते पूर्णतः दुरुस्त करण्यापूर्वी ही वाहतूक सुरू करणे एकदम चुकीचे आहे. वाहतूक पोलिस यंत्रणाही कुचकामी ठरत आहे.

- बाळकृष्ण होडारकर, माजी नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT