Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 68 गुंडांसह 760 जणांची धरपकड; 681 भाडेकरूंची कसून पडताळणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police राज्यात जी-20 परिषदेची पहिली बैठक पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याने सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक भागांत पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिबंधक कारवाईखाली गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 68 गुंडांसह 760 जणांची धरपकड केली. तसेच 681 परप्रांतीय भाडेकरूंचीही पडताळणी केली.

भाडेकरूंची माहिती पोलिस स्थानकात न दिल्याप्रकरणी खोली मालकाविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

कोलवाळ पोलिसांनी आज (गुरुवारी) पहाटे मुशीरवाडा येथे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवून पोलिसांत भाडेकरूंची माहिती न दिलेल्या 101 जणांना ताब्यात घेतले.

या चौकशीवेळी 37 जणांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे सापडली नसल्याने खोली वा घरमालकाला पोलिस स्थानकात त्यांची माहिती जमा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कोलवाळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी दिली.

भाडेकरूंच्या पडताळणीची मोहीम यापुढेही अधूनमधून सुरूच राहणार आहे. भाडेपट्टीवरील व्यक्तींची नोंद पोलिसांत केली नसल्यास संबंधित घरमालकाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विक्रेते, दलालांविरुद्ध धडक कारवाई

किनाऱ्यावर पर्यटकांची सतावणूक टाळण्यासाठी फेरीवाले, विक्रेते तसेच काही दलालांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. त्यांना अटक केली जात आहे. किनाऱ्यावर दलाल वावरत असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई कऱण्याच्या सूचना कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली होती.

आता पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही त्यामध्ये लक्ष घालून पोलिसांनी पर्यटन खात्याच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. परंतु पर्यटन खात्याकडे नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अधिक आक्रमक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

कोलवाळ पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी आज, गुरुवारी सकाळी मुशीरवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत भाड्याने राहाणाऱ्यांची पडताळणी केली. यावेळी 101 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानकावर आणले. त्यातील 39 जणांकडे आवश्‍‍यक कागदपत्रे नव्हती.

या सर्वांना सीआरपीसीअंतर्गत अटक करून नंतर म्हापसा एसडीएमसमोर हजर केले. पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार नाईक, कुणाल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत, संतोष आर्लेकर व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

यासंदर्भात कोलवाळचे पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक म्हणाले, मुशीरवाडा परिसरात आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन राबविले. ‘जी-20’च्या गोव्यात 17, 18 व 19 एप्रिलला बैठका होत आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार हे ऑपरेशन राबविण्‍यात आले.

मध्यंतरी ‘लाला की बस्ती’मध्ये अशाच प्रकारे मोहीम राबविली होती. अस्नोडा येथे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण केल्याबद्दल कोलवाळ पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

‘जी-20’ परिषदेच्या कालावधीत राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात आहे. सुरक्षा चोखपणे बजावण्यासाठी पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना सक्रिय केले आहे.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन हे स्वतः रात्रीच्यावेळी किनारपट्टी भागात पोलिस फौजफाटा घेऊन गस्त घालण्याचे काम करत आहेत. किनारपट्टी भागात समाजकंटकांच्या हालचालींवर नजर व देखरेख ठेवण्यात येत आहे. ज्या समाजकंटकांची पोलिस स्थानकात ‘हिस्ट्रीशिटर’ म्हणून नोंद आहे, त्यांना बोलावून ताकीद देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विनापरवाना मसाज पार्लर पोलिसांच्या रडारवर : कळंगुट परिसरात गुरुवारी क्राईम ब्रँचच्या पथकाने मसाज पार्लर व स्पा आस्थापनांची कसून तपासणी केली. यावेळी या पथकाने सुमारे 14 मसाज पार्लर्सची तपासणी केली.

या कारवाईवेळी ‘ब्लू तेर्रा स्पा’कडे आरोग्य सेवा खात्याचा परवाना नसताना ते सुरू केल्याचे उघडकीस आले. यावर कारवाईसाठी पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT