A Tamarind Branch Fell On A Moving Bike Dainik Gomantak
गोवा

काळ आला होता, पण... सावईवेरे- माशेल मार्गावर घडली काळजात धडकी भरवणारी घटना

चालत्या दुचाकीवर कोसळली चिंचेची फांदी

गोमन्तक डिजिटल टीम

A Tamarind Branch Fell On A Moving Bike सावईवेरे ते माशेल या मुख्य मार्गावरील सावई रस्त्यालगत कुंपणाच्या आत असलेल्या चिंचेच्या झाडाची भली मोठी फांदी मुख्य रस्त्यावर चालत्या दुचाकीवर कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीचालक बचावला.

ही घटना गुरुवारी (ता.25) सकाळी 10.30 वा.च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, वारा-पाऊस नसतानाही के.आर.एस.एस. हायस्कूलच्या पुढे सुमारे 200मीटर अंतरावर सावई भागात मुख्य रस्त्यावर चिंचेच्या झाडाची फांदी अचानक तुटून दुचाकीवर कोसळली.

हा दुचाकीस्वार सावईवेरेहून माशेलला जात होता. त्याने हेल्मेट परिधान केल्याने तसेच दैव बलवत्तर म्हणून त्याला कोणतीही जबर इजा झाली नाही. त्याच्या दुचाकीचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्थानिकांना झाड पडल्याचे कळताच त्वरित घटनास्थळी जाऊन प्रथम दुचाकी व दुचाकीस्वाराला बाजूला काढले. दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

अन्यथा अनर्थ घडला असता

ही फांदी वीजतारांवर कोसळल्याने वीजतारांचेही नुकसान झाले. गुरुवारी वीज खात्यातर्फे सावईवेरे फिडरवर दुरुस्ती काम चालू असल्याने सावईवेरे व वळवई भागात वीजपुरवठा खंडित होता. अन्यथा फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

काही वेळ वाहतूक ठप्प:

चिंचेची फांदी तुटून रस्त्यावर पडल्याने रस्ता काहीवेळ वाहतुकीस बंद होता. यावेळी स्थानिक व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित फांदीचा काही भाग हटवून एका बाजूने रस्ता वाहतुकीस खुला केला.

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी फांदी पडून तुटलेल्या वीजतारांबाबत आवश्‍यक खबरदारी घेतली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने फांद्या कापून बाजूला काढल्या व रस्ता पूर्णपणे वाहतुकीस खुला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

Goa Opinion: ‘कूल’ गोवा हा ‘कोल’ गोवा करून, विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याचे काय?

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT