Goa Budget Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023: नगराध्यक्ष-नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ; अधिसूचना जारी

पालिकांच्या श्रेणीनुसार नगराध्यक्ष व नगसेवकांच्या मानधनात केलेली वाढ समान आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget Session 2023: पालिका प्रशासनाने नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करून खूशखबर दिली आहे.

हल्लीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. पालिकांच्या श्रेणीनुसार नगराध्यक्ष व नगसेवकांच्या मानधनात केलेली वाढ समान आहे.

अ गट नगराध्यक्षांना २५ हजार, ब गट २२ हजार तर क गट नगराध्यक्षांना २० हजारांपर्यंत वाढ केली आहे. पूर्वी हे मानधन गटवारीनुसार पालिकांना अनुक्रमे १२,८२५ रुपये, ११,४७५ रुपये व १०,८०० रुपये असे होते.

आता नगरसेवकांच्या मानधनात सरसकट १८ हजार रुपये वाढवले आहेत. यापूर्वी नगरसेवकांना पालिका श्रेणीनुसार अनुक्रमे १०,८०० रुपये, १०,१२५ रुपये व ९,४५० रुपये मिळत होते.

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात पालिका नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर पालिका प्रशासनाने ८ जून रोजी गोवा पालिका कायद्याखालील दुरुस्ती मसुदा नियम केले व त्याच्यामुळे ज्यांच्यावर परिणाम होणार आहे, अशा लोकांकडून सूचना व हरकती मागवल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT