Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Panajim: पणजी जिमखाना परिसरात उभारणार भाऊसाहेबांचा पुतळा

Panajim: माजी मुख्यमंत्री तथा भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा जिमखान्याच्या परिसरात उभारला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Panajim: पणजी जिमखान्याची स्थापना ज्यांनी केली त्या माजी मुख्यमंत्री तथा भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा जिमखान्याच्या परिसरात उभारला जाणार आहे. प्रख्यात छायाचित्रकार संजय हरमलकर यांनी हा पुतळा तयार केला असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मिरामार येथील समाधीस्थळी मनोहर पर्रीकर यांचा जो पुतळा निर्माण केला आहे तो संजय हरमलकर यांनीच. हरलकर यांनी 25 दिवसांपासून हा पुतळा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या पुतळ्याची जिमखान्याची कार्यकारी समिती बुधवारी पाहणी करणार आहे.

पर्रीकर यांचा पुतळा पाहिल्यानंतर जिमखान्याच्या समितीने हरमलकर यांच्याशी संपर्क साधला. क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेऊन उभे राहिलेले भाऊसाहेब यांचे एक छायाचित्र आहे. त्या छायाचित्रावरून हा पुतळा निर्माण केला आहे.

पणजी जिमखान्यात प्रवेश केल्यानंतर उद्यानाजवळ हा पुतळा दिसेल, अशा ठिकाणी तो स्थापित केला जाणार आहे. जानेवारीत जिमखान्यावर क्रिकेट स्पर्धा सुरू होतील, त्यावेळी येणाऱ्या लोकांना तो पुतळा नजरेस पडेल, अशी आशा समितीला आहे. कमी वेळेत पुतळा बनविण्यासाठी काही लोकांचे योगदान लाभत असल्याचे हरमलकर यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT