Horror Films at IFFI 53: चित्रपट हा सर्वांचा आवडता विषय आहे, त्यात भयपट पाहण्यासाठी प्रेक्षक अधिक उत्सुक असतात. अमेरिकन चित्रपट निर्माता, जॉन कारपेंटर यांना ‘मास्टर ऑफ हॉरर फिल्म्स’ म्हणून ओळखले जाते. ड्रॅक्युला, एक्सॉर्सिस्ट, कन्जुरिंग, स्पाइन-चिलिंग यासारख्या हॉरर चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोव्यात 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात International Film Festival of India (IFFI) जगातील काही सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
नाईट सायरन (स्लोव्हाकिया) (Night Siren (Slovakia / 2022)
नाईट सायरन हा तेरेझा नव्होटोवा यांनी दिग्दर्शित केलेला हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपटात एका तरुणीची कहाणी आहे. ही तरूणी तिच्या बालपणातील विविध त्रासांबद्दल उत्तरे शोधत असते. त्याचवेळी ती प्राचीन दंतकथामध्ये अडकून पडते आणि तिच्यावर जादूटोणा आणि खूनाचा आरोप केला जातो.
नाईट सायरन हा उत्कट आणि गूढ भयपट म्हणून प्रसिद्धस आला आहे. याशिवाय या चित्रपटात स्लोव्हाकियामधील प्राचीन समजुती तसेच, आधुनिक जगातील मिसोजीनी, झेनोफोबिया, उन्माद यासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो.
ह्युसेरा (पेरू) (Huesera (Peru / 2022)
मेक्सिकन चित्रपट निर्माता मिशेल गार्झा सेर्व्हेरा यांनी दिग्दर्शित केलेला ह्युसेरा हा एक खूप नावाजलेला भयपट आहे. यामध्ये नतालिया सोलियनने व्हॅलेरियाची भूमिका केली आहे. या चित्रपटात नतालिया एक गरोदर स्त्री भूमिका करत असून तिला रहस्यमय शक्तींपासून धोका आहे. नतालिया सोलियनला येणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी ती जुन्या प्रथा आणि जादुटोणा यांची मदत घेते.
ह्युसेरा ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये जागतिक प्रीमियर झाला. यामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा दिग्दर्शक आणि नोरा एफ्रॉन पुरस्कार मिळाला आहे.
व्हीनस (स्पेन) Venus (Spain / 2022)
व्हीनस हा एक स्पॅनिश भयपट आहे. शहरी भागातील कथा असणारा हा सिनेमा आधुनिक जादूटोणा या विषयावर आधारित आहे. ‘द फियर कलेक्शन’मधील दुसरा भाग असलेला हा चित्रपट जौम बालागुएरो यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांनी केली आहे.
अमेरिकन लेखक एचपी लव्हक्राफ्ट यांच्या 'द ड्रीम्स इन द विच हाऊस' या लघुकथेवर आधारित या सिनेमाची कथा आहे.
हॅचिंग (फिनलंड, स्वीडन) Hatching (Finland, Sweden / 2022)
हॅचिंग हॅना बर्घोल्म दिग्दर्शित फिनिश भयपट आहे. हॅचिंग प्रीमियर सनडान्स चित्रपट महोत्सवात 23 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला. हॅचिंग चित्रपटाने गेरार्डमेर इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स आणि प्रिक्स डु ज्युरी ज्युन्स हे पुरस्कार जिंकले आहेत.
हॅचिंग चित्रपट तिन्जा या तरुण जिम्नॅस्टवर आधारीत असून, ती आपल्या आईला खूश करण्यासाठी एका ब्लॉगद्वारे कुटुंबाची माहिती जगासमोर मांडत आहे. तिन्जाला एक दिवस, एक रहस्यमय अंडे सापडते, ते ती घरी घेऊन येते. त्यातून बाहेर आलेल्या प्राण्याचे नाव ती "एली" असे ठेवते. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर देखील हा चित्रपट तुमचा पाठलाग सोडत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.