53th IFFI: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या काळात पार पडणार यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी चुरस सुरु आहे. असे असले तरी इफ्फीची सुरुवात ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या चित्रपटाने होणार आहे.
( 53rd International Film Festival of India will be held in Goa from November 20 to 28)
मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या 'अल्मा आणि ऑस्कर' या चित्रपटाने इफ्फीची सुरुवात होणार आहे. या सोहळ्यात तीन भारतीय चित्रपटांचा ही समावेश असणार आहे. असे असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात बाजी कोण मारणार हे पाहावे लागणार आहे. कारण या विभागातील विजेत्यांना सुवर्ण मयुर पुरस्कार मिळणार असल्याने यासाठी टोकाची चुरस सुरु आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी घेतला आढावा
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कामकाजाचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज आढावा घेतला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले आहे की, हा महोत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रीतपणे नियोजनात भाग घेणे महत्त्वाचं आहे. मुरुगन हे गेले दोन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही पाहणी केली.
ज्युरींमध्ये इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकांचा समावेश
सुवर्णमयुर पुरस्कारासाठी विजेते निवडण्याचं काम सोपवलेल्या ज्युरींमध्ये इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि भारतातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.