IFFI Goa 2022: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वरुण धवनच्या 'भेडिया' ची पाहायला मिळणार झलक

IFFI Goa 2022: वरुण धवनचा 'भेडिया' हा चित्रपट गोव्यात होणाऱ्या 53व्या इफ्फीमध्ये थिएटरला रिलीज होण्यापूर्वी प्रीमियर होण्याची शक्यता आहे
IFFI Goa 2022
IFFI Goa 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील सिनेप्रेमींसाठी नोव्हेंबर हा खास महिना आहे. गोव्यात (Goa) या महिन्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) लोक वाट पाहत आहेत. 53 व्या इफ्फी सेलिब्रेशनला सुरुवात होण्यास काही दिवस उरले असून फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात रिलीज होणारा ' भेडिया ' हा चित्रपटाची झलक पाहायला मिळणार आहे.

  • चित्रपटाच्या स्क्रिनिंगला स्टार देखिल उपस्थित राहणार का?

बॉलीवूड हंगामा नुसार , वरुण धवन आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट 'भेडिया' इफ्फीमध्ये (IFFI 2022) प्रदर्शित होणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक, निर्माता दिनेश विजान तसेच चित्रपटाची स्टारकास्ट वरुण , कृती, दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी हे देखील चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

IFFI Goa 2022
IFFI: 'द काश्मीर फाईल्स'सह 15 भारतीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांत प्रतिष्ठेच्या 'सुवर्ण मयुर'साठी चुरस
  • या दिवशी होणार रिलीज

'भेडिया' 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये पाहायला मिलणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा (Movie) ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील चित्रपटाची झलक दिनेश विजानच्या 'स्त्री'ची आठवण करून देणारी आहे. 'स्त्री' आणि 'भूल भुलैया'प्रमाणे या चित्रपटात सस्पेन्स आणि कॉमेडीचा रंजक तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • जगभरातील सिनेप्रेमी इफ्फीची वाट पाहत आहेत

गोव्यात (Goa) दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इफ्फीचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे.या वर्षी महोत्सवाची सुरुवात ऑस्ट्रियन चित्रपट 'अल्मा आणि ऑस्कर'ने होणार आहे.भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'भेडिया' व्यतिरिक्त, मधुर भांडारकरचा 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपट देखील येथे रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी झी5 वर प्रसारित होणार आहे. या सोहळ्यात ' आरआरआर ', 'जय भीम', 'द काश्मीर फाइल्स' आणि 'मेजर' देखील दाखवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com