Rohan Khaunte | Govind Gaude | Jit Aolkar  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मंत्री-आमदारांमध्ये दिसून आला खास 'याराना'; ऐन उन्हाळ्यात कूल काश्मिर सफारी

पर्वतरागांमध्ये अनुभवली 'दिल चाहता है' मोमेंट; गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Akshay Nirmale

Goa's Minister in Kashmir: गोव्याचे दोन मंत्री आणि एक आमदार यांचा काश्मिरमधील एक फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोमध्ये राज्यातील दोन मंत्री आणि एक आमदार यांची मैत्री दिसून येत आहे. एरवी पर्यटक 'दिल चाहता है' मोमेंट अनुभवण्यासाठी गोव्याकडे येत असतात. गोव्याच्या मंत्री, लोकप्रतिनिधींनी अशी 'दिल चाहता है' मोमेंट काश्मिरमध्ये अनुभवली आहे.

या फोटोमध्ये पर्यटन मंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे आणि मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर हे पाठमोरे उभे असलेले दिसतात. हा फोटो जम्मू-काश्मिरमधील पीर पंजाल पर्वतरांगांमधील आहे.

काश्मिरमधील हा भाग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या गोव्यात कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. त्या पार्श्वभुमीवरही या तिन्ही नेत्यांनी ही काश्मिरची कूल सफर केली आहे.

दरम्यान, खंवटे आणि गावडे हे दोघेही सरकारमध्ये मंत्री आहेत. तर जीत आरोलकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे असून हा पक्षदेखील भाजपसोबत सत्तेत आहे. दरम्यान, या फोटोमुळे या तिघांमधील खास मैत्रीच्या चर्चा आता गोव्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT