Fishing Boat Dainik Gomantak
गोवा

Mormugao बंदरात खलाशाचा खून; दोघेजण बेपत्ता

गुजरात येथील धनलक्ष्मी-24 या मासेमारी ट्रॉलरवरील खलाशांमध्ये घडला प्रकार

दैनिक गोमन्तक

वास्को: गुजरात येथील धनलक्ष्मी-24 या मासेमारी ट्रॉलरवरील खलाशांमध्ये 20 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वाद झाला. या वादाचे रुपांतर एका खलाशाच्या खूनात झाले. तर तिघेजण जखमी झाले. त्या तिघांपैकी दोघांजणाना दुसऱ्या ट्रॉलरमधील खलाशांनी व इतरांनी वाचविले. तर जखमी झालेला आणखी एक खलाशी आणि संशयित आरोपी असे दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले.

(A sailor from Gujarat Murdered at Mormugao port Two other sailors are missing )

आज दुसऱ्या दिवशी (22 ऑक्टोबर रोजी ) त्यांचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी हार्बर येथील कोस्टल पोलिस स्थानकामध्ये तक्रार देण्यात आली. समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या दोघांजणांचा शोध घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची मदत मागण्यात आली होती. अद्याप शोध जारी. समुद्रात मासेमारी करणारा धनलक्ष्मी ट्रॉलर मुरगाव बंदर समुद्रकिनाऱ्यावर 22 सागरी मैलावर असताना ही घटना घडली. ही घटना 20 रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली.

या ट्रॉलरवर काम करणारा एक खलाशी उमेश बासुमतरी सेमला (33, आसाम) याने हातोडाचा डोक्यावर प्रहार करून ट्रॉलरचा तांडेल महेंद्राभाय सोमाभाय सोळंकी (33, गुजरात) याला जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने महेंद्राभाय मरण पावला. त्यानंतर उमेश याने ट्रॉलवरील किशोरभाय नाजाभाय नेगाल (33) योगेश लक्ष्मणभाय सिकोत्रिया (27) अजय वेलजीभाय पानजोरी (25) यांच्यावर हातोड्याने हल्ला करून जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी ते तिघेही समुद्रात पडले.

या ट्रॉलरवरील एकंदर हालचाली पाहून तेथे इतर मासेमारी ट्रॉलर्स आले. त्यांनी समुद्रात पडलेल्या किशोरभाय व योगेश यांना वाचविले. मात्र, अजय पाण्यात बेपत्ता झाल्याने त्याचा शोध लागला नाही. इतर ट्रॉलर्स जवळ येत असल्याचे पाहून संशियत उमेश याने घाबरून पाण्यात उडी घेतली. तोही पाण्यात बेपत्ता झाला. याप्रकरणी महेंद्राभाय सोळंकी याचा भाऊ प्रताप सोळंकी (35) याने हार्बर कोस्टल पोलिस स्थानकावर तक्रार नोंदविली.

त्यानुसार संशयित उमेश व अजय यांचा शोध घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या बोगमाळो चिकोळणा येथील मुख्यालयाला कोस्टल पोलिसांनी पत्र पाठविले. त्यानुसार काल पासून शोध जारी आहे. तर आज दुसऱ्या दिवशीही त्या दोघांचाही पत्ता लागला नाही. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT