Bicholim: पावसाच्या तडाख्याने मये-वायंगिणी पंचायतीचे छप्पर कोसळले

मये वायंगिणी पंचायतीचे छप्पर कोसळले
Bicholim Rain
Bicholim Rain Dainik Gomantak
Published on
Updated on

गेले iदोन दिवसात गोव्यात पावसाने कहर केला असून, राजधानी पणजीसह गोव्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. तर काही भागात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचेही समोर आले. या पार्श्वभूमीवर डिचोलीत ही परतीच्या मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.

(Maem Vayangani Gram Panchayat roof collapsed due to heavy rain )

Bicholim Rain
पाच महिने पगार नसल्याने पेरा शिक्षकांची दिवाळी काळोखातच

मिळालेल्या माहितीनुसार डिचोली परिसराला आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. यावेळी मये वायंगिणी पंचायतीच्या पत्र्याचे छप्पर कोसळल्याची घटना घडली आहे. हे छप्पर पंचायतीच्या दारात लावलेल्या दुचाकींवर कोसळल्याने दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कमी वेळात अधिक प्रमाणात पाऊस लागल्याने काही वेळातच पाणी रस्त्यावरुन साचले होते. अशी माहिती समोर आली आहे.

Bicholim Rain
ELD मासेमारीवरुन न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले, कडक कारवाईचे आदेश

मच्छीमारांनी सतर्क रहाण्याची गरज

शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी वादळसदृश पावसाने राजधानी पणजीला झोडपून काढले आहे. या पावसाने पणजी शहराला ही झोडपले आहे. 20 मिनिटांत तब्बल 31.4 मिमी. एवढा पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी खोदलेले गटार तुंबली होती. तसेच वाहनचालक व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

येत्या दोन दिवसांत राज्यातून मान्सूनची माघारची शक्यता असल्याने मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे मच्छीमारांना हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देत सतर्क राहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com