A promising future for Michael Lobo Sayings of Chief Minister Sawant
A promising future for Michael Lobo Sayings of Chief Minister Sawant  Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo: भविष्‍यकाळ मायकल लोबोंसाठी आश्‍‍वासक; मुख्‍यमंत्री सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Michael Lobo: कळंगुटचे आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी त्‍यांच्‍या मतदारसंघात विजयाची हॅट्‌ट्रिक पूर्ण केली आहे. यापुढेही या मतदारसंघात लोबो आपला चांगला ठसा उमटवतील हे निश्‍चित. ते एक चांगले समन्वयक आहेत. मध्यंतरी त्‍यांनी भाजपची साथ सोडली, परंतु नंतर घरवापसी करताना विरोधी पक्षातील आठ आमदारांना भाजपमध्‍ये आणून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले, असे मुख्यमंत्री डॉ‌. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मायकल लोबो यांच्या जन्मदिनानिमित्त पर्रा येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्‍यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे, समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, शिवोलीच्या आमदार तथा मायकल लोबो यांची पत्नी दिलायला लोबो आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, लोबो यांच्या वाढदिवसानिमित्त कळंगुट मतदारसंघातील पंचायत मंडळांचे सदस्य, बार्देश तालुका तसेच राज्यातील विविध भागातील लोकांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्‍छांचा वर्षाव केला.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

कळंगुट मतदारसंघात भरीव विकासकामे झालेली आहेत. रस्ता रुंदीकरण अथवा अन्‍य विकासकामांसाठी स्थानिक लोकांची योग्य प्रकारे समजूत काढून त्यांच्या मालकीची जागा सरकारच्या ताब्यात घेणे मोठे अवघड काम असते. आमदार लोबो यांनी ही किमया सहज साधली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity Department: वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे बोरी-शिरोड्यात नागरिक त्रस्त

Assagao Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरण! पूजा शर्माला क्राईम ब्रँचच्या एसआयटीचा समन्स

Goa Marathi Academy: गोवा मराठी अकादमीतर्फे पुरस्कारांसाठी आवाहन

Goa News: विद्यालये आणि धार्मिक स्थळांपाशी मद्यविक्री परवाने हवेत कशाला? मद्यविक्रेता संघटनेचा सरकारला घरचा आहेर

OBC Federation Of Goa: राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मुरगाव तालुक्यात बैठक

SCROLL FOR NEXT