Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : दुधाच्या टाकाऊ पिशव्या संकलनाचा डिचोलीत प्रकल्प

Bicholim News :मिनरल फाउंडेशनचे सहकार्य,छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळेत उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, ‘शहर प्लास्टिक आणि कचरामुक्त ठेवा’ या संकल्पनेंतर्गत डिचोलीत दुधाच्या टाकाऊ पिशव्या संकलित करण्याचा विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

डिचोली पालिकेच्या सहकार्याने गोवा मिनरल फाउंडेशनतर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळा संकुलात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

कचरा व्यवस्थापन महामंडळ, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संस्थांचेही या प्रकल्पाला पाठबळ मिळाले आहे. एका विशेष सोहळ्यात डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, ॲड. रंजना वायंगणकर, मिनरल फाउंडेशनचे पराग रांगणेकर, श्रद्धा रांगणेकर, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे साईश, छत्रपती शिवाजी महाराज सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता मांद्रेकर, लाखेरे प्रकल्पाच्या प्रतिनिधी करिश्मा ताटे उपस्थित होत्या. शहर कचरा आणि प्लास्टिकमुक्त ठेवायचे असल्यास मुलांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन सचिन देसाई यांनी केले.

असा आहे प्रकल्प

घरगुती वापरात येणाऱ्या दुधाच्या टाकाऊ पिशव्या बाहेर टाकल्या, तर त्यापासून मोठी समस्या निर्माण होत असते.

सरकारी शाळेत सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत मुलांनी शाळेत येताना दुधाच्या पिशव्या स्वतःबरोबर आणून शाळेत ठेवलेल्या पेटीत संकलित कराव्यात. या पिशव्यांवर नंतर होंडा येथील प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणार आहे. दुधाच्या पिशव्या कशा कापाव्यात. त्याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT