Goa G20 Meet: G-20 बैठकांच्या आयोजनामुळे वाढली गोव्याची ब्रँड व्हॅल्यू; नोडल अधिकाऱ्यानी व्यक्त केली भावना

पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीच्या आयोजनानंतर जुलैमध्ये या गटाच्या आणखी दोन बैठका
G20 In Goa
G20 In Goa Goa G20 Meet
Published on
Updated on

Goa G20 Tourism Minister Meet: G-20 पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन केल्यानंतर गोव्यात जुलैमध्ये या प्रभावशाली गटाच्या आणखी दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. त्याच्या तयारीसाठीही गोवा सज्ज झाला आहे.

दरमयान, G-20 बैठकांसारख्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याने गोव्याची 'ब्रँड व्हॅल्यू' वाढली आहे, असे मत गोव्यातील G-20 बैठकीचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले आहे.

G20 In Goa
Baga Accident: भरधाव कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले; बागा येथे खांबावर आदळली कार

चौथ्या आणि अखेरच्या जी-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीतील G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी G-20 पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीतील सदस्यांना गोव्यातील बीचेस, निसर्ग आवडला.

गोव्याने या पर्यटनावरील बैठकीपूर्वी स्टार्ट-अप, वित्त, लेखा, विकास आणि आरोग्याशी संबंधित G-20 कार्यक्रमांच्या पाच बैठकांचे आयोजन केले होते. ज्यामुळे राज्यात झालेल्या G-20 संबंधित बैठकांची संख्या 7 झाली आहे.

गोव्यातील G-20 बैठकीचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “पर्यटनविषयक अलीकडील दोन बैठका गोव्यात झालेल्या सहाव्या आणि सातव्या G-20 बैठका होत्या. राज्यात नऊ G-20 कार्यक्रम होणार आहेत.

स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक आणि दुसरी G-20 बैठक जुलैमध्ये होणार आहे. पर्यटनाशी संबंधित बैठकींप्रमाणेच हे दोन्ही कार्यक्रमही 19 ते 22 जुलै दरम्यान होणार आहेत. अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी राज्यात केलेला पायाभूत सुविधांचा विकास हा तात्पुरता नसून दीर्घकालीन असतो.

G20 In Goa
Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून धावणार; मडगाव रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी

या देशांचे मंत्री सहभागी होणार

पर्यटन मंत्रिस्तरीय बैठकीत यूके, ओमान, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे मंत्री आणि इतर अनेक देशांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

संजित रॉड्रिग्स म्हणाले की, , “गोवा हे संमेलन, प्रोत्साहन, अधिवेशने आणि प्रदर्शने (MICE) यासाठीचे आवडते ठिकाण आहे. मोठ्या परिषदांसाठी येथे भरपूर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. म्हणून गोव्याची निवड एक नैसर्गिक निवड बनते.

MICE पर्यटन हा पर्यटनाचा एक प्रकार आहे. ज्यात पूर्व नियोजनानुसार मोठ्या गटांना एकत्र आणले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com