Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

Goa Crime News: पीडित गर्भवती : अज्ञातांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

माशेल येथील एका सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याने ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळ उत्तर प्रदेश येथील पण सध्या माशेल येथे राहणाऱ्या या मुलीला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

गेले दोन महिने पीडित मुलगी गप्पच होती; पण अचानक ती आजारी पडल्याने तिला इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता, ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर इस्पितळातील डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

म्हार्दोळ पोलिसांनी पीडित मुलीची जबानी घेतली असता, तिने त्या दोघा दुचाकीस्वारांची माहिती दिली. म्हार्दोळ पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतही एका युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नाकाला रुमाल लावून केले बेशुद्ध

हा प्रकार गेल्या 10 जानेवारी रोजी घडला. ही अल्पवयीन मुलगी माशेल येथील एका जत्रोत्सवातून आपल्या घरी चालत जात असता, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात स्वारांनी तिला अडविले आणि तिच्या नाकाला रुमाल लावला. त्यामुळे ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

म्हापशात कामावर गेलेली युवती परतलीच नाही

म्हापसा : पेडे-म्हापसा येथील कविता चंद्रकांत सातार्डेकर (वय २४ वर्षे) ही युवती गुरुवार,२८ मार्चपासून बेपत्ता झाली आहे. म्हापसा पोलिस तिचा शोध घेत आहेत. येथील कॉस्मॉस इमारतीमधील एका खासगी आस्थापनात कविता कामाला होती. गुरुवारी सकाळी ती कामावर जाते, असे सांगून घरातून निघाली.

मात्र, ती कामावर पोचलीच नाही. संध्याकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली; परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर घरच्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस साहाय्यक उपनिरीक्षक शोभा नाईक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT