Mapusa Police Station Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: अल्पवयीन मुलाने रस्त्यावर केला बाईक स्टंट; पोलिसांनी गाडीमालकाला केली अटक

व्हिडिओ झाला होता व्हायरल, म्हापसा पोलिसांनी ओळख पटवून केली कारवाई

Akshay Nirmale

Mapusa News: एक मुलाचा दुचाकी चालवत असताना रस्त्यावर बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून पोलिसांनी संबंधित गाडी आणि गाडीमालकाचा शोध घेतला.

संबंधित बाईकस्वार अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी गाडीमालकालावर अटकेची कारवाई केली. म्हापसा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धोकादायकरित्या वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप संबंधितांवर ठेवला आहे.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये कानका येथील रस्त्यावर एक मुलगा दुचाकी चालवत स्टंट करताना दिसत होता. म्हापसा पोलिसांनी वयाने अल्पवयीन आढळलेल्या या दुचाकीस्वाराची ओळख पटवली.

या स्कूटरचा नोंदणी क्रमांक GA-03-AK-5549 असा आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अकबर सय्यदपीर लिंगदारकोप (वय 27) असे गाडीमालकाचे नाव आहे. तो गंगानगर खोर्ली, म्हापसा येथील रहिवासी आहे. त्यानेच स्कूटर संबंधित अल्पवयीन मुलाला दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अकबर याला अटक करण्यात आली.

तर या अल्पवयीन मुलाच्या दुचाकीवर मागे बसलेला त्याचा नातेवाईक सैदहुसाब लिंगदारकोप याला पोलिसांनी ताकीद दिली आहे. अल्पवयीन मुलाची रवानगी मेरशी येथील अपना घर येथे करण्यात आली आहे. त्याने हेलमेट परिधान केले नव्हते.

तसेच वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासत तो दुचाकी चालवत होता. म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी शेटकर हे अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT