Mapusa Court Dainik Gomantak
गोवा

Mapusa Court: हातात बियर घेऊन बुलेटवरून सैर; आसामच्या चालकाचा परवाना निलंबित, 10 हजार दंड

Mapusa Court: दुचाकी चालक किरण बोरा दारुच्या नशेत 27 फेब्रुवारी रोजी हणजूण पोलिसांना बुलेत चालवताना सापडला होता.

Pramod Yadav

Mapusa Court

बियरवर ताव मारत बुलेटवरुन फेरफटका मारणाऱ्या आसामच्या दुचाकी चालकाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दुचाकी चालक किरण बोरा दारुच्या नशेत 27 फेब्रुवारी रोजी हणजूण पोलिसांना बुलेत चालवताना सापडला होता. म्हापसा न्यायालयाने बोराला दोषी ठरवून परवान निलंबित करण्यासह दंह ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण बोरा (आसाम) 27 फेब्रुवारी रोजी जीए 03 एके 5866 ही दुचाकी चालवत होता. दुचाकीवरच तो मद्य देखील पित असल्याचे आढळून आले होते. हणजूण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला.

म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असते त्याने गुन्हा कबूल केला आहे.

न्यायालयाने किरण बोराला दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 1988 च्या कलम 20 नुसार वाहन चालक परवाना नियमावलीनुसार त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

SCROLL FOR NEXT