A goods wagon derailed at vasco Konkan Railway service disrupted Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: वास्कोत मालगाडी रुळावरुन घसरली; कोकण रेल्वेची वाहतूक सुरुळीत सुरु

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटनाही समोर आल्या आहेत. कोकण रेल्वे सेवाही ठप्प झाली होती.

Manish Jadhav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे सेवाही काही दिवसांपूर्वी ठप्प झाली होती. याचदरम्यान वास्कोतील तानिया हॉटेलजवळ मालगाडी रुळावरुन घसरली.

वास्को येथे मालवाहू रुळावरुन रेल्वे घसरल्याने वास्को-पटना गाडी विलंबाने धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्या सुरुळीत सुरु आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी, रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ रेल्वे रुळांवर माती आल्याने वाहतूक खोळंबली होती. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली होती. सायंकळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. तीन तासांत मातीचा ढीगारा हटवून वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती.

एक्स सोशल मिडियावर याबाबत एका यूजरने माहिती दिली होती. दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागेल, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT