Goa MLA Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'त्या' बारा आमदारांना दिलासा

आमदार अपात्रता याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा देताना फेटाळल्या

Vilas Mahadik

गोवा: 12 आमदारांविरोधात काँग्रेस व मगो पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा देताना फेटाळल्या त्यामुळे त्या बारा आमदारांना व पात्रता पासून दिलासा मिळाला आहे. (A Goa bench of Bombay High Court today ruled on disqualification petition of 12 MLAs in Goa)

काँग्रेस (Goa Congress) या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे. हा निकाल काँग्रेसच्या विरोधात लागल्याने मागच्या निवडणुकीसारखी पुनरावृत्ती याहीवेळी होण्याची धास्ती काँग्रेसला आहे. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या याचिकेवरील अंतिम सुनावणी 11 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. त्यावरील निवाडा राखीव ठेवला होता. याचिका दाखल केलेल्यांपैकी सर्वजण विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर तसेच अपक्षपणे लढवत आहेत. त्यातील काहींनी आमदारकीचा (Goa MLA) राजीनामा दिलेला आहे. उच्च न्यायालयाचा हा निवाडा गोव्याबरोबरच इतर राज्यांमध्येही त्याचा संदर्भ घेतला जाणार आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा ठरणार आहे. 2019 मध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांच्या गटाने व मगोच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये (Goa BJP) प्रवेश केला होता. या आमदारांनी घटनेतील 10 व्या परिशिष्टाचे उल्लंघन प्रवेश केल्यानंतर आमदार अपात्रतेला काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तसेच मगोतर्फे सुदिन ढवळीकर यांनी 2 आमदारांविरुद्ध वेगवेगळ्या याचिका सभापतींसमोर सादर केल्या होत्या. राज्यात कोविड महामारी असल्याने ही सुनावणी सभापतींनी सुमारे दोन वर्षे प्रलंबित ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT