Liquor Smuggling: Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling: गोव्याचे आणखी काहीजण रडारवर

Liquor Smuggling : मायकल डिसोझा, मनीष मिश्राला न्यायालयीन कोठडी

दैनिक गोमन्तक

Liquor Smuggling:

गुजरातला विनापरवाना दारू पाठविल्याप्रकरणी गोव्यातील आणखी काही जणांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील मुख्य संशयित सुरेश बिष्णोई (रा. राजस्थान) याला पकडल्यानंतर तशी कारवाई सुरू केली जाईल. तूर्त गोव्यातून याप्रकरणी अटक केलेल्या मायकल डिसोझा (नावेली) आणि मनीष मिश्रा (साळगाव) यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

गुजरात गुन्हा अन्वेषण विभागाचे नवसारी येथील पोलिस निरीक्षक डी. एस. करात म्हणाले की, या प्रकरणात गुंतलेल्या संशयितांची माहिती संकलीत केली जात आहे. ती झाल्यावर पोलिस पथक गोव्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास निश्चितपणे थंडावलेला नाही.

नवसारी येथे 9 मार्च रोजी गुजरातच्या गुन्हा अन्वेषण विभागाने ट्रकमधून नेली जाणारी दारू पकडली होती. ती रामपूर-गोध्रा येथे रमेश वनकर याने उतरवून घेतली होती. याप्रकरणी ट्रकचालक आणि वनकर याला ताब्यात घेतल्यानंतर डिसोझा आणि मिश्रा यांची नावे पोलिसांना समजली होती.

डिसोझा याने दारू विकली होती, तर मिश्रा याने या बनावट दारूचे उत्पादन केले होते, असे तपासात आढळून आले होते. त्यामुळे गुजरात पोलिसांनी गोव्यात येऊन या दोघांना अटक करून गुजरातला नेले आहे. या दोन्ही संशयितांना पोलिस कोठडीचा रिमांड २६ मार्च रोजी संपल्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

प्रकरणाची व्याप्ती मोठी

पोलिस निरीक्षक करात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०.४० लाख रुपयांची दारू पकडली असली या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. अनेकजण यात गुंतले असू शकतात. त्यांनी यापूर्वीही दारूची वाहतूक केली असू शकते. या सर्व शक्यता गृहित धरून पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे त्याची माहिती आताच देता येत नसली तरी गोव्यातून यात गुंतलेल्या आणखी काहीजणांना अटक होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND 3rd ODI: लॉर्ड्सवर टीम इंडियाची नवी रणनिती? ईशान-सुंदर बाहेर, 'या' दोन दिग्गजांची होणार एन्ट्री; पाहा संभाव्य Playing XI

Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

Sexual Assault Case: पहिल्या मजल्याचे CCTV फुटेज गायब; पीडितेचे वर्तनही संशयास्पद, तपासातील त्रुटींवर तरुण तेजपालच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद

Sonam Wangchuk Hunger Protest: उपोषणकर्ता आजारी, की समाजव्यवस्था?

"आता नाही जागे झालात, तर कधी...?" सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरुन हटवताच भडकला विशाल ददलानी; देशवासियांना केला थेट सवाल VIDEO

SCROLL FOR NEXT