Bootlegger On The Run Arrested From Goa Dainik Gomantak
गोवा

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

एसएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी आहे.

Manish Jadhav

Bootlegger On The Run Arrested From Goa: गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा आणि सौराष्ट्रमध्ये विदेशी दारु पाठवणाऱ्या मुख्य तस्करापैकी एक असलेल्या भरत उर्फ ​​भुराजी डांगी याला स्टेट मॉनिटरिंग सेलने (SMC) पणजीतील एका हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात अटक केली. यावेळी त्याच्याकडून दोन मोबाईलसह 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एसएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये 50 हून अधिक दारुबंदीचे गुन्हे दाखल आहेत. 2022 पासून अहमदाबाद शहर, अहमदाबाद ग्रामीण, पंचमहाल, अरवली, साबरकांठा आणि वडोदरा शहरात नोंदवलेल्या नऊ प्रकरणात त्याचे नाव होते.

गुजरातमध्ये विदेशी दारु पाठवणाऱ्या मुख्य तस्करांपैकी तो एक होता. गुजरातच्या (Gujarat) पोलीस महासंचालकांनी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, आरोपी गोव्यातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले.

गोव्यातील हॉटेलवर छापेमारी

दरम्यान, एसएमसीच्या पथकाने पणजी येथील हॉटेल द क्रिसेंटवर छापा टाकून आरोपीला (भरत) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पणजीहून गुजरातला आणण्यात आले. वडोदरा शहरातील हर्णी पोलिस ठाण्यात 2022 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणात 17122 विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या, ज्याची किंमत 18.30 लाख रुपये होती. या बाटल्यांसह एकूण 26.38 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. विदेशी दारुची ही खेप आरोपी भरतनेच पाठवली होती.

पुढील तपासासाठी आरोपीला वडोदरा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुजरातमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत SMC ने 77 वाँटेड आरोपींना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT