Crime News: सियानंतर आता उर्मिला! लग्नाला अवघे 3 दिवस असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या, जंगलात फेकला मृतदेह; दाजीसोबतच्या प्रेमसंबंधातून रचला कट

Jharkhand groom murder case: झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना एका तरुणाची नियोजनबद्ध हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या होणाऱ्या वधूवर आणि तिच्या दाजीवर आहे. पोलिसांच्या तपासात या हत्येमागे प्रेमसंबंध हेच प्रमुख कारण असल्याचे समोर आले असून, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.

बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह जंगलात सापडला

गिरिडीह जिल्ह्यातील जमुआ परिसरातील 20 वर्षीय नीरज हाजरा हा 5 जुलै रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सुरुवातीला बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र नातेवाईकांनी अपहरणाची शक्यता व्यक्त केल्याने तपासाची दिशा बदलली. काही दिवसांतच बिहारमधील जंगलात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख नीरज अशी पटली आणि हे प्रकरण थेट हत्येचे असल्याचे स्पष्ट झाले.

एसआयटीच्या तपासातून उलगडले धक्कादायक सत्य

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोडण्यात आली. या तांत्रिक तपासामुळे संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आणि संपूर्ण कट उघडकीस आला.

Crime News
Goa American citizen: गोव्यातील विदेशींच्या वास्तव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! नेपाळला जाणाऱ्या अमेरिकन नागरिकाला यूपीतील सोनौली सीमेवर अटक

प्रेमसंबंध ठरले हत्येचे कारण

पोलिस तपासानुसार, नीरजशी विवाह निश्चित झालेल्या तरुणीचे तिच्याच दाजीसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी विवाह निश्चित केल्यानंतर हे नाते त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे दोघांना वाटत होते. त्यामुळे नीरजला कायमचा मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच त्याला बोलावून त्याची हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बिहारमधील जंगलात टाकण्यात आला.

दोन मुख्य आरोपी अटकेत

तपासादरम्यान पोलिसांनी तरुणी आणि तिच्या दाजीला अटक केली आहे. त्यांच्या कबुलीजबाब आणि माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूटी जप्त करण्यात आली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या गुन्ह्यात इतर काही व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यासाठी झारखंड आणि बिहारमध्ये छापेमारी सुरू आहे.

Crime News
Goa FDA: दूध भेसळीवर 'एफडीए'चा कडक वचक! संचालक श्वेता देसाई यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात तब्बल 33 प्रकरणांत कायदेशीर कारवाई

तांत्रिक पुराव्यांमुळे कट उघड

या संपूर्ण तपासात डिजिटल पुरावे, मोबाईल लोकेशन आणि वैज्ञानिक तपास पद्धतींची महत्त्वाची भूमिका राहिली. आरोपींनी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीत संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guwahati Crime News
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh
Congress Leader Shot Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com