Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: मद्यपी ‘कदंब’ बसचालक निलंबित: मुख्यमंत्री

Kadamba Transport: दारू पिऊन कदंब बस चालविणाऱ्या चालकाचा परवाना निलंबित केला जाईल, सध्या त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे,

दैनिक गोमन्तक

Kadamba Transport: दारू पिऊन कदंब बस चालविणाऱ्या चालकाचा परवाना निलंबित केला जाईल, सध्या त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली. कदंब परिवहन महामंडळाची पणजी ते वाळपई प्रवासी घेऊन जाणारा बसचालक एल्विस रॉड्रिग्स (वय ४९), रा. जुने गोवे हा मद्याच्या धुंदीत होता.

सायंकाळी तो नशेमध्ये बस घेऊन जात होता, त्याने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता. कदंबा पठारावर प्रवाशांनी ही बस त्या चालकाला थांबवायला भाग पाडले आणि सर्व प्रवासी त्यातून खाली उतरले.

नशेत वाहन चालवल्याप्रकरणी चालक एल्विसविरोधात जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल झाली असून त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते.

दरम्यान, या चालकाला सेवेतून निलंबित करण्यात आले असून, अशाप्रकारे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पणजीतील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT