Chandel Water Treatment Plant Dainik Gomantak
गोवा

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Chandel Water Treatment Plant: चांदेल येथील जल प्रकल्पात (मंगळवारी) झालेली क्लोरीन गॅस गळती पेडणे अग्नी शमन दलाने वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Chandel Water Treatment Plant: चांदेल येथील जल प्रकल्पात (मंगळवारी) झालेली क्लोरीन गॅस गळती पेडणे अग्नी शमन दलाने वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. प्रकल्प अभियंते सागर कुमार यांनी दूरध्वनीवरुन पेडणे अग्नीशमन दलाला क्लोरीन गॅस गळतीची माहिती दिली.

पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या नेतृत्वाखाली ऊप अधिकारी सुनील देसाई , दलाचे जवान राजन खरात, सहदेव परब व आशीर्वाद गाड , शाम आरोंदेकर , चालक मार्टीयस मेंडोझा या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व ओपन सर्किट पॉझिटिव्ह प्रेशर कॉम्प्रेस्ड एअर ब्रीदिंग ऑपरेटस सेट चा वापर करून खास रसायनाचा वापर करून गॅस गळती आटोक्यात आणली. दूर अंतरापर्यंत या गॅसचा उग्र दर्प पसरला होता.

उलटी, डोळ्यांना त्रास

क्लोरीन वायू हा जल शुध्दीसाठी वापरण्यात येतो.पाण्यातील कचरा तळाला नेऊन शुध्द पाणी देण्याचे काम करते. मात्र, क्लोरीन विषारी असतो.त्याची बाधा झाल्यास उल्टी, डोळ्यावर व संपूर्ण आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. अशा गळतीवेळी काळजीपूर्वक कृती करून गळती रोखावी लागत असल्याचे नामदेव परवार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT