Sankhlim Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election 2023: तीन प्रभागांमध्ये नगरसेवक विरुद्ध नगरसेवक; चार ठिकाणी थेट लढत

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim Municipal Council Election 2023: साखळी नगरपालिका निवडणूक ही यावेळी बरीच रंगतदार ठरणार आहे. नगरपालिकेच्या तीन प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक विरुद्ध नगरसेवक असे समीकरण आहे. चार प्रभागांमधून थेट नवीन चेहरे नगरपालिकेत प्रवेश करणार आहेत.

चार प्रभागांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार असून या चारही प्रभागांचा निकाल हा कमालीचा आणि अनपेक्षितही लागू शकतो. या सर्व राजकारणात कोण बाजी मारणार याबाबत अद्याप साखळीत तर्कवितर्क लढविले जात नाहीत, हे विशेष. याबाबत थोडे आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग क्र.1 मध्ये नगरसेवक यशवंत माडकर यांना नगरसेविका कुंदा माडकर यांनी आव्हान दिले आहे. या प्रभागात अन्य दोन उमेदवारही रिंगणात आहेत.

प्रभाग क्र.४ मध्ये माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी यांच्याविरोधात नगरसेवक रश्मी देसाई यांचे आव्हान आहे. या प्रभागात अन्य एक उमेदवार रिंगणात आहे.

प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेवक दयानंद बोर्येकर यांना नगरसेवक राजेंद्र आमेशकर यांनी आव्हान दिले आहे. या प्रभागात या दोघांमध्ये थेट लढत होत आहे. तर प्रभाग क्र. ११ मध्ये रश्मी घाडी विरुद्ध दीपा जल्मी या दोन नवीन महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

चार नवीन चेहरे

या नगरपालितील चार प्रभागांमधून यावेळी थेट चार नवीन चेहरे यावेळी नगरपालिकेत नगरसेवक बनून प्रवेश करणार आहेत. प्रभाग क्र. २ मध्ये ज्योती गोसावी, नुरजहा अल्ताफ खान, प्रसादिनी कुडणेकर, निकिता नाईक हे सर्व नवीन उमेदवार आहेत.

प्रभाग क्र. ६ मध्ये डॉ. सरोज देसाई, विनंती पार्सेकर, हसन शफी, संचिता सालेलकर हे चार उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये रश्मी घाडी विरुद्ध दीपा जल्मी, प्रभाग क्र. १२ मध्ये अंजना कामत, आश्विनी कामत व प्रज्वला नाईक हे उमेदवार रिंगणात आहेत.

तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत

यावेळी चार प्रभागांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. या सर्व लढती तुल्यबळ उमेदवारांमध्ये रंगणार आहेत. प्रभाग ३ मध्ये माजी नगरसेविका तथा सक्रिय महिला नेत्या सुनीता वेरेकर यांच्या विरोधात सिध्दी पोरोब या एक सक्रिय व युवा महिला नेत्या रिंगणात आहेत.

प्रभाग ९ मध्ये नगरसेवक आनंद काणेकर यांना भाग्यश्री ब्लेगन यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग १० मध्ये नगरसेवक दयानंद बोर्येकर यांच्या विरोधात नगरसेवक राजेंद्र आमेशकर यांचे आव्हान आहे.

ब्लेगन यांची प्रथमच ‘एन्ट्री’

प्रभाग क्र. ५ मधून बिनविरोध निवडून आलेले प्रवीण ब्लेगन हे साखळीत नगरपालिका स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत नगरसेवकाच्या रूपात दिसले नव्हते. यापूर्वी लढविलेल्या निवडणुकांमध्ये त्यांना यश अले नव्हते.

गेल्याच निवडणुकीत (२०१८) त्यांची पत्नी ज्योती ब्लेगन या प्रभाग क्र. ५ मधून निवडून आल्याने प्रवीण यांची अप्रत्यक्षपणे पालिकेत एन्ट्री झाली होती. परंतु यावेळी ते स्वतः एका नगरसेवकाच्या भूमिकेत वावरताना दिसणार आहेत.

प्रभाग ८ बिनविरोध

प्रभाग क्र. ७ मध्ये नगरसेवक ब्रह्मानंद देसाई हे रिंगणात आहेत. त्यांना इतर तीन उमेदवारांचे आव्हान आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये रियाझ खान यांचीही बिनविरोध निवड झालेली आहे. या प्रभागातील चक्क पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन रियाझ यांचा मार्ग निवडणुकीविना मोकळा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT