Margao Police Station Dainik Gomantak
गोवा

Namita Phatarpekar: नमिता फातर्पेकरविरुद्ध महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद; धार्मिक दुखावण्याचा आरोप

Margao Police: फातर्पेकर हिला धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Police: धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील संशयित नमिता फातर्पेकर हिला नोटीस देण्यासाठी गेलेल्‍या पोलिस शिपाई अस्‍मिता महाले यांना शिवीगाळ करून चावल्‍याच्‍या आरोपाखाली मडगाव पोलिस स्‍थानकात आणखी एक गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. फातर्पेकर हिला धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या आरोपाखाली कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केली आहे.

श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण संस्‍थान तसेच या संस्‍थानाच्‍या समितीच्‍या विरोधात श्रेया धारगळकर आणि इतरांनी आक्षेपार्ह व्‍हिडिओ व्‍हायरल करून भाविकांच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याचा दावा करून रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या सुमारे ४०० भाविकांविरोधात कुंकळ्‍ळी पोलिसांनी हमरस्‍ता अडवून वाहतुकीला अडथळा आणल्‍याबद्दल गुन्‍हा नोंद केला आहे.goa

दरम्यान, २० मे रोजी भाविकांनी श्रेया धारगळकरसह संशयितांच्या अटकेसाठी बाळ्‍ळी येथे राष्‍ट्रीय हमरस्‍ता अडवला होता. सुमारे अडीच तास वाहतूक बंद झाली. आता या प्रकरणी कुंकळ्‍ळी पोलिसांनी सुमारे ४०० अज्ञात भाविकांविरोधात भादंसंच्‍या १४३ (दंगा माजविणे), ३४१ (अडवणूक करणे), ४३१ (सार्वजनिक रस्‍त्‍यावर अडवणूक करणे) यासह १४९ (जमाव करुन दंगल माजविणे) तसेच, राष्‍ट्रीय हमरस्‍ता कायद्याच्‍या कलम ८ (ब) खाली गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रक़रणी उपनिरीक्षक एस. वेळीप हे तपास करीत आहेत. महिला पोलीस शिपाई अस्‍मिता महाले यांना फातर्पेकर हिने शिविगाळ करून तिच्‍या हाताचा चावा घेतल्‍याच्‍या आरोपाखाली मडगाव पोलिसात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'22 मिनिटांचा तो थरार' विसरु नका, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकड्यांना थेट इशारा; 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेलं नाही!

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

SCROLL FOR NEXT