Karmal Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat Accident: करमल घाटात टँकरच्या धडकेनंतर कार दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, चार जखमी

जखमींना रूग्णालयात दाखल केले

Akshay Nirmale

Karmal Ghat Accident: करमल घाटात झालेल्या कारच्या अपघातात एक जण ठार झाला आहे. ही कार टँकरला धडकून दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. अरूण गांधी (वय 19) असे मृताचे नाव आहे. उर्वरीत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंधेरी (मुंबई) येथून हे पाच जण कारमधून गोव्यात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी मडगावहून ‘रेंट अ कार’ बुक केली होती. सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ते पाळोळे येथून मडगावच्या दिशेने निघाले होता.

करमल घाटात अरुंद रस्ता व धोकादायक वळणावर त्यांची कार पोहोचली असता मडगावहुन कारवारच्या दिशेने निघालेल्या टँकरची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कार सुमारे 10 मीटर खोल दरीत कोसळली.

त्यात अरुण गांधी जागीच ठार झाला. तर मेद पाटवा (19), अमेय जनत्रे (19), सिया चोरडीया (19) व सेहावी लोढा हे चौघे जखमी झाले. त्यांना काणकोणच्या सरकारी रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मडगाव येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Goa Live Updates: महत्त्वाचा निकाल! गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने 7 वर्षांच्या मुलीला भारतीय नागरिकत्वाचा दिला हक्क

SCROLL FOR NEXT